टाईट आणि ब्राईट स्किन ठेवण्यासाठी खास टिप्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 3 September 2020

त्वचा साफ करण्याची योग्य पद्धत माहिती असली पाहीजे. त्वचेला आवश्यक पोषणतत्व मिळविण्यासाठी हेल्दी डायट घेणे आवश्यक आहे, त्यामुळे त्वचा टाईट आणि ब्राईट होईल. त्यासाठी आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.

आपली त्वचा सुंदर आणि कोमल असावी असे बहुतांश तरुणांना वाटते. त्यासाठी विविध उपाय केले जातात. हेल्दी आणि चमकदार त्वचा ठेवण्यासाठी स्किनकेअर विषयी अनेकांना सखोल माहिती नसते. त्यासाठी हेल्दी डायट, स्किनकेअर रुटीन आणि पर्यावरणातील बदल समजून घ्यावे लागतात. त्वचा साफ करण्याची योग्य पद्धत माहिती असली पाहीजे. त्वचेला आवश्यक पोषणतत्व मिळविण्यासाठी हेल्दी डायट घेणे आवश्यक आहे, त्यामुळे त्वचा टाईट आणि ब्राईट होईल. त्यासाठी आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.
 

त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर प्रोडक्टची निवड

त्वचेवर उपाय करण्यापुर्वी त्वचेचा प्रकार समजून घेणे महत्त्वाचे आहे. ऑईली, ड्राय किंवा समीश्र यापैकी एका प्रकारची त्वाचा असू शकते. त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर प्रोडक्ट निवडल्यास निश्चित बदल जाणवतो. त्यासाठी त्वचा तज्ज्ञाची मदत घ्यावी.  

क्लिंझींग, टोनिंग, आणि मॉइश्चराझिंग

त्वचा चमकदार आणि हेल्दी ठेवण्यासाठी क्लिंझींग, टोनिंग, आणि मॉइश्चराझिंग केली पाहीजे, दिवसातून कमीत कमी दोन वेळा स्वच्छ पाण्यानी चेहरा धुतला पाहीजे. टोनिंगसाठी त्वचेच्या प्रकारानुसार टोनर किंवा गुलाबजल यांचा वापर करता येतो. त्वचा ऑईली असेल तर पाणी आधारित मॉइश्चरायजरचा उपयोग करु शकता. त्वचा ड्राय असेल तर तेल आधारित घट्ट मॉइश्चरायजर उपयुक्त असते.

स्क्रबिंग अनिवार्य

स्किनकेयर रुटीनचा स्क्रबिंग एक अनिवार्य भाग आहे. त्वचेवरचे बंद झालेले च्छिंद्र पुन्हा सुरु करण्यासाठी स्क्रबिंग महत्वाचे आहे. स्क्रबिंगमुळे धुळ, प्रदूषण, सुक्ष्मकण निघून जातात. त्वचा साफ तजेलदार दिसते. वेळ मिळेल तेव्हा तरुणाई स्क्रब करु शकते, मात्र त्वचा संवेदनशील असेल तर आठवड्यातून एकदा स्क्रब करणे योग्य राहील.

सनस्क्रीमचा उपयोग

उन्हाळ्यात सनस्क्रीमचा वापर केला जातो. मात्र त्वचेसाठी बारा महिने सनस्क्रीम आवश्यक आहे. प्रत्येक रुतू नुसार सनस्क्रिम उपलब्ध आहेत. त्याचा वापर तरुणांनी करावा. सनस्क्रीम त्वचेला सुर्यापासून वाचवतो व त्वचेची निगा राखण्यास मदत करतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News