मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चार महिन्यापासून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. लॉकडाऊनमुळे कौटुंबीक दिनक्रम बदलून गेली. दिवस रात्र घरात राहून महिलांची मानसिकता ढासाळू लागली. कुटुंबाची सर्व जबबदारी सांभाळत असताना स्वत:च्या आरोग्याकडे महिलांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांनी निरोगी आरोग्यासाठी थोडा वेळ काढून व्यायम आणि योगासने करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संतुलीत आहार घेणे गरजेचे आहे. कोरोना काळात महिलांना फिट राहण्यासाठी १० टिप्स सांगणार आहोत. त्याचा दैनंदीन जीवनात उपयोग केल्यास आयुष्यभर फायदा होईल.

१. भरपूर झोप आणि पाण्याचे योग्य सेवन:
दिवसभर केलेल्या कामाचा थकवा दूर करण्यासाठी भरपूर झोप घेणे आवश्यक आहे. २४ तासातून ८ तास झोप घेतली तर थकवा दूर होतो. त्यामुळे दिवसभर फ्रेश राहण्यास मदत मिळते. एकाच वेळी भरपूर पाणी सेवन न करता, थोड्या थोड्या अंतर पाणी सेवन करावे, त्यामुळे शरीराचे तापमाण संतुलीत राहते. युरिनद्वारे रोग बाहेर पडतात.

२. व्यायाम आणि ध्यान:
कोरोना काळात बाहेर फिरण्यासाठी बंदी असल्यामुळे घराच रहावे लागते. त्यामुळे शरिराची हालचाल कमी होतो. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे हा उत्तम पर्याय आहे. व्यायामुळे शरीर फिट राहते. आणि ध्यानामुळे मन एकाग्र होते. त्यामुळे व्यायाम आणि ध्यान करणे महिलांसाठी लाभदायक आहे.

४. या सवयी टाळा:
अनेक वेळा वाकून महिलांना काम करावे लागते. त्याचबरोबर बसून काम करतांना चुकीची बैठक पद्धती वापरली जाते. त्यामुळे महिलामंध्ये स्लिप्ड डिस्क आणि सर्व्हाइकल स्पोंडिलीसिस आजाराचा त्रास जाणवतो. काम करताना याग्य प्रकारे बसावे, जनेकरुन त्रास होणार नाही आणि मानेचा हलका व्यायाम करावा.

३. स्क्रिन पासून दूर रहा:
लॉकडाऊन काळात बाहेर फिरणे बंद असल्यामुळे महिलांचा अधिक वेळ मोबाईल, संगणक, टीव्ही पाहण्यात जातो. त्यामुळे महिलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. आणि डोळ्याचे विकास होत आहेत, त्यामुळे स्क्रिन पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. दिवसभरातून अर्धातास डोळ्यांचा व्यायाम करावा, दुरच्या वस्तू पाहाव्यात त्यामुळे नजर तेज होते आणि डोळ्यांच्या विकारापासून बचाव होतो.

५. संतुलीत आहार :
निरोगी आरोग्यासाठी संतुलीत आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. आहारातून प्रथिने, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळाले पाहीजे, त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आहारासोबत ताक किंवा ज्युस असे द्रव पदार्थ सेवन केल्याने फायदा होतो आणि आरोग्य स्वस्थ राहाते.

६. मासिक पाळीत अशी घ्या काळजी:
मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातली ठरलेली क्रिया आहे. कामामुळे अनेक वेळा मासिक पाळीकडे महिला लक्ष देत नाही, त्यामुळे आजार होण्याची शक्याता अधिक असते. मासिक पाळी काळात स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. एका विशिष्ट वेळेनंतर नॅपकीम पॉड बदलणे गरजेचे आहे. काही तरुणी नॅपकीम पॅट पुर्ण ओला होऊ पर्यंत बदलत नाहीत. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. पाळीच्या काळात काही तासांनी पॅड खराब झाला नाही तरी बदलावा. त्यामुळे रोग टाळता येतात.

७. गोड टाळा:
साखरेमुळे शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शुगर, बी.पी. जाडेपणा, हार्ट डिसेस होण्याची शक्यता असते, त्यामुळे दैनंदीन जीवनात साखरेचा वापर कमी करावा, सारखेऐवजी गुळाचा वापर करावा. त्यामुळे रोगापासून दूर राहता येते.

८. कवळे उन्ह घ्या:
सकाळचा सुर्यप्रकार शरिरासाठी उत्तम असतो. कोवळ्या उन्हात उभा राहिल्यामुळे सुर्याच्या किरणांपासून शरीराला 'ड' जीवनसत्व मिळतात. 'ड' जीवनसत्वापासून कॅल्शियम मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात. शरीरातील हाडे कणखर बनतात. त्यासाठी कोवळे उन्ह शरिराला लाभदायक आहे. खास करुन महिलांनी कोवळे उन्ह घ्यावे.

९. छंद जोपासा:
दैनंदीन कामामुळे महिलांना वैयक्तीक वेळ मिळत नाही, मात्र स्वत:साठी थोडासा वेळ काढून महिलांनी छंद जोपासावा. नवनवीन प्रयोग करावे, त्यामुळे मनात नवचौतन्य निर्माण होते.

१०. वाईट सवयी टाळा:
काही महिला सिगरेट, मद्य, तंबाखूचे सेवन करतात त्यामुळे आजाराला निमंत्रन मिळेत. नियोगी राहण्यासाठी वाईट सवयीपासून महिलांनी दुर रहावे. त्यामुळे आरोग्य स्वस्थ राहते.