कियारा साकारणार विशेष भूमिका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 May 2019

‘कबिर सिंग’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘गुड न्यूज’ यांसारख्या बिग बजेट हिंदी चित्रपटांबरोबरच कियाराच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. 

अगदी कमी कलावधीत बॉलीवूडमध्ये नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. येत्या वर्षात कियाराकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली आहे.

‘कबिर सिंग’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘गुड न्यूज’ यांसारख्या बिग बजेट हिंदी चित्रपटांबरोबरच कियाराच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. 

‘इंदु की जवानी’ या कॉमेडी चित्रपटात कियारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कियारा म्हणते, ‘एका डेटिंग ॲपमुळे इंदूच्या आयुष्यात घडणारे किस्से या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

माझ्याकडे हा हटके प्रोजेक्‍ट आला आणि लगेचच मी काम करण्यास होकार दिला.’ निखिल अडवाणी, निरंजन अयंगर आणि रायन स्टीफेन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News