आयुष्मान खुराणा 'या' चित्रपटात साकारणार विशेष भूमिका

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Wednesday, 29 May 2019

आयुष्यमान खुराना याचा आगामी चित्रपट 'आर्टिकल 15'चा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्यमान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आयुष्यमान खुराना याचा आगामी चित्रपट 'आर्टिकल 15'चा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्यमान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

46 सेकंदाच्या या टिझरमध्ये आयुष्यमान भारतीय संविधानाच्या आर्टिकल 15 बद्दल सांगत आहे. आयुष्यमान म्हणतो, 'धर्म, नस्ल, जाति, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही अधिकारावर राज्य आपल्या कोणत्याही नागरिकासोबत कोणताही भेदभाव करणार नाही. हे मी नाही सांगत आहे, हे भारताच्या संविधानात लिहीले आहे. 1950, फर्क खूप केला, आता फर्क आणायचाय.

चित्रपटाची कथा उत्तरप्रदेशच्या बदायूं येथे झालेला रेप आणि हत्येच्या घटनेवर आधारित आहे. या घटनेत दोन दलित अल्पवयीन मुलींवर गँगरेप करुन त्यांची हत्या केली होती.

या घटनेच्या टिकेची झोड संपूर्ण देशभर उमटली. ही घटना 27 मेला घडली होती, त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी 27 मेला टिझर प्रदर्शित केला. या चित्रपटाचा ट्रेलर 30 मेला प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News