एक नातं विशेष ! 

शुभम शं. पेडामकर
Sunday, 2 August 2020
  • कुठे आहेस ? ह्या विंकेंडला हा प्लॅन करू , तू येणार आहेस का ? Ok मग मी पण येईल मज्जा करूया , अरे माझा ना हा प्रॉब्लेम झाला आहे काय तरी सोल्युशन दे पटकन , मला ना तुला एक सिक्रेट सांगायचं आहे..

कुठे आहेस ? ह्या विंकेंडला हा प्लॅन करू , तू येणार आहेस का ? Ok मग मी पण येईल मज्जा करूया , अरे माझा ना हा प्रॉब्लेम झाला आहे काय तरी सोल्युशन दे पटकन , मला ना तुला एक सिक्रेट सांगायचं आहे.... 

वरील सर्व उदाहरणे केवळ ह्यासाठी देत आहे कारण दैनंदिन जीवनात ह्या उदाहरणातील वाक्य आपण सर्वांत जवळच्या व हक्काच्या व्यक्तीला बोलत असतो तो म्हणजे आपला मित्र किंवा मैत्रीण . 

मैत्री ह्या दोन शब्दांमध्ये विश्वास, साथ, प्रेम, काळजी इ.अनेक गोष्टी जोडण्याची ताकद आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक ना एक मित्र किंवा मैत्रीण असते .त्या व्यक्ती सोबत आपण आपली सुख-दुःख अगदी मनमोकळ्यापणाने मनात कोणतीही शंका न बाळगता शेअर करत असतो.बिनधास्त आपली मते , आपले विचार, निरनिराळ्या क्लुप्त्या सांगत असतो व त्याबद्दल मते जाणून घेत असतो. सकाळी उठल्यापासून Gm च्या मेसेज पासून रात्री Gn Sd Tc च्या मेसेजपर्यंत आपली घट्ट नाळ जोडली गेलेली असते. काही वेळा कामात खूप व्यस्त असल्याने संवाद साधला जात नाही अश्यावेळी नाकावर राग ठेऊन गाल फुगवून रुसण्याचा अधिकार आणि रुसल्यानंतर मनवण्यासाठी केलेले फनी प्रयोग मैत्रीमध्येचं आजमवण्यासाठी मिळतात. कोणत्याही विषयावर गहन चर्चा अर्थात गप्पांच्या मैफिली याच व्यक्तीसोबत कधी कॉलवर, तर कधी शक्य झाल्यास व्हिडिओ कॉल किंवा कधी साधा मेसेज करून साधण्यात येते. त्यातून येणारे तर्क-वितर्क भन्नाट असतात.कधी-कधी जर आपलं कुणीच ऐकण्यासाठी तयार नसेल तर बळजबरीने हक्काने आपलं ऐकण्यासाठी ती व्यक्ती तयार असते आणि तू बोलत रहा, तुझं बोलणं मला फार आवडतं असं म्हणतं मैत्रीतील प्रेम खुलवंत असते. थोडक्यात काय तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व नात्यांपैकी "मैत्री" चं नातं हे कायमस्वरूपी विशेष असतं....

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News