नवीन उद्योगांसाठी विशेष तरतुद केली पाहिजे : विनायक पाटील

यिनबज
Friday, 31 January 2020

एक तरुण म्हणून माझी हि नेहमी अपेक्षा राहिली आहे, की माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला नोकरी मिळाली पाहिजे.

मुंबई : उद्या (ता. १ फेब्रुवारी) भारताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सादर करणार आहे. फेब्रुवारीनंतर येणाऱ्या मार्च ते एप्रिल या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल, याचा अंदाज या अर्थसंकल्पातुन मांडला जातो. मागच्या दोन वर्षांपासून महसूल वाढीचा दर सातत्याने कमी होत आहे. उदयोग क्षेत्रातील आणि कृषी क्षेत्रातील कमी झालेल्या उत्पादनामुळे महसूल दर कमी होत आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. यामुळेच बेरोजगारीचाही प्रश्न तोंडवर काढत आहे. या पार्श्वभूमीवर यिनबझ ने काही तरुणांच्या उद्या मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया घेतल्या आहेत. 

 

एक तरुण म्हणून माझी हि नेहमी अपेक्षा राहिली आहे, की माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला नोकरी मिळाली पाहिजे. पण नोकरी तेव्हाच मिळू शकते जेव्हा नवनवीन उद्योग उदयास येतील. यासाठी सरकारने अर्थसंकल्पात नवीन उद्योगांसाठी विशेष तरतुद केली पाहिजे. जेणेकरून नवीन उद्योगांमुळे आम्हाला रोजगाराची संधी मिळू शकेल. 

- विनायक पाटील (रुईया कॉलेज)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News