बहीणभावाचे प्रेम दृड करण्यासाठी टपाल खात्याचे खास पाकीट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 July 2020
  • भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला सण रक्षाबंधन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे.
  • या दिवशी दूर राहणा-या भावाला राखी पाठवणा-या बहिणीसाठी टपाल खात्याने एक नवीन योजना तयार केली आहे.

भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला सण रक्षाबंधन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी दूर राहणा-या भावाला राखी पाठवणा-या बहिणीसाठी टपाल खात्याने एक नवीन योजना तयार केली आहे. टपाल खात्याकडून एक विशेष पाकिट तयार करण्यात आले आहे. टपाल खात्याचं हे पाकिट अतिशय माफक दरात मिळणार असून त्याची किंमत दहा रूपये ठेवण्यात आली आहे. या योजनेमधून भावाबहिणीचे प्रेम दृड व्हावे, हा टपाल खात्याचा एक प्रयत्न आहे. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेकजण शहरात अडकले आहेत, तर काहीजण ग्रामीण भागात अडकले आहेत. त्यातचं सरकारच्या नियमावली नुसार सार्वजनिक सण साजरे करण्यावर अनेक बंधने आली आहेत. रक्षाबंधनामुळे सध्याची नकारात्मक भावना सकारात्मक होईल हा उद्देश टपाल खात्याचा आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात टपाल खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कामावर हजर होता. 

कोरोनाच्या काळात दुरावलेले नातेसंबंध जवळ यावे यासाठी टपाल खात्याकडून एक पाकीट तयार करण्यात आले आहे. हे पाकिट फक्त दहा रूपयाला मिळणारे असून तरूणाईला खूप आवडेल असे टपाल खात्याच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर हे पावसाळ्यातही हे पाकिट टिकू शकेल असंही त्यांनी सांगितले आहे. 

टपाल खात्याकडून भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला सण रक्षाबंधन सण उत्साहात साजरा व्हावा हा हेतू असल्याचं मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी सांगितले. आम्ही उपलब्ध करून दिलेल्या संधीचा तरूण चांगला फायदा करून घेतील असंही त्या म्हणाल्या. आजपासून हे पाकिट तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात मिळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News