स्पेशल केएफसी स्टाइल चिकन विंग रेसिपी; जाणून घ्या कशी बनवावी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020

सध्या पावसाळा सुरू झाला की, गरम गरम आणि चटकदार पदार्थ खाण्याची अनेकांना  इच्छा असते, त्यामुळे घरच्या घरी केएफसी स्टाइल चिकन विंग कसं बनवाव हे आम्ही सांगणार आहोत.

केएफसी चिकनची भुरळ अनेक खवय्यांना आहे. घरच्या घरी अतिशय कमी मसाल्यामध्ये केएफसी स्टाइल चिकन विंग बनतात येईल. आपणाला पाहिजे तसं कुरकुरीत रेसिपी तयार करता येईल. सध्या पावसाळा सुरू झाला की, गरम गरम आणि चटकदार पदार्थ खाण्याची अनेकांना  इच्छा असते, त्यामुळे घरच्या घरी केएफसी स्टाइल चिकन विंग कसं बनवाव हे आम्ही सांगणार आहोत

कृती 

चिकन विंग, (साफ केलेले) हळद पावडर, दही, लाल मिरची पावडर, काळी मिरची, चिकन मसाला, लिंबू, चिकनला कोट करण्यासाठी मसाला चिप्स आणि तेल इत्यादी साहित्य लागेल.

कशी बनवावी केएफसी चिकन विंग रेसिपी 

सर्वप्रथम एका कटोर्‍यामध्ये चिकन विन काढून घ्या, त्यामध्ये सर्व सामग्री मिसळून फ्रीजमध्ये ठेवा, तीस मिनिट अर्धा तास मॅग्नेट करण्यासाठी पुरेसा आहे. दुसरीकडे मसाला चिप्स थोडा वेळ भाजून घ्या, त्याला लालसर कलर यावा, त्यानंतर मसाला चिप्सचे पावडर करा. तीन मिनिटानंतर फिजमध्ये ठेवलेले टिकन मॅग्नेट बाहेर काढा. चिकन मॅग्नेटला मसाला पावडर लावून घ्या. दुसरीकडे एका कढईमध्ये तेल घेऊन ते गरम करायला ठेवा. चिकनला मसाला चिप्स पावडर लावून तेलामध्ये सोडा आणि कुरकुरीत होईपर्यंत चिकना तळून घ्या. थोड्यावेळानी चिकन पिसला लालसर कलर येईल. कुरकुरीत स्पेशल केएफसी स्टाईल चिकन विंग रेसिपी तयार होईल, मध्ये लिंबूरस टाकून गरम गरम खाण्याची मजाच वेगळी असते. अशा प्रकारे कमी वेळात टेस्टी आणि हेल्दी चिकन विंग बनवता येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News