परीक्षेसाठी सरकारचे खास मार्गदर्शक तत्व; विद्यार्थी, पर्यंवेक्षक, परीक्षा केंद्रांना बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 September 2020
 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन तत्वे जाहीर केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि शिक्षण संस्थांना हे तत्व लागू होणार आहेत

मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, अशा परिस्थितीत सरकारने परीक्षा आयोजित करण्याचे आदेश दिले, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. 13 सप्टेंबर पासून नीट आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठाच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत, त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन तत्वे जाहीर केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि शिक्षण संस्थांना हे तत्व लागू होणार आहे. परीक्षा कालावधीत मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन करावे असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 

जाणून घेऊया काय आहेत मार्गदर्शन तत्व 

 • विद्यार्थ्यांनी सहा फुटाचे अंतर आणि तोंडावर मास्क लावून परीक्षा द्यावी  
 • सॅनिटायझर किंवा साबणाने सतत हात धुवावे 
 • परीक्षा कालावधीत शिंका किंवा खोकला आल्यास तोंडावर रुमाल ठेवून शिकावे 
 • एखादा आजार असल्यास त्यांची माहिती पर्यवेक्षकाला द्यावी 
 • परीक्षा केंद्रात मोबाईल आणि बॅगला प्रतिबंध करण्यात आले
 • आरोग्य सेतू ॲप सुरू ठेवणे अनिवार्य करण्यात आले

विद्यापीठ, शिक्षण संस्था, परीक्षा केंद्र यांच्यासाठी नियम 

 • कँटोन्मेंट झोनच्या बाहेर परीक्षा केंद्र स्थापन करण्यास अनुमती आहे 
 • कँटोन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही 
 • कँटोन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा घेतली जाईल
 • विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी प्रवेशद्वाराजवळ विशेष योजना करावी 
 • परीक्षा केंद्रात सोशल डिस्टंसिंगचे पाळण्यासाठी बैठक व्यवस्थेत बदल करावा 
 • कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेस कवर, फेस मास्क, सॉनिटायगर इत्यादी वस्तूंची व्यवस्था परीक्षा केंद्रात करावी 
 • परीक्षा घेणारा आणि देणारा दोघांनीही आपल्या आरोग्याचे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून द्यावे
 • परीक्षा केंद्रात येण्यापूर्वी सोबत कोणत्या गोष्टी घेऊन येणार आहात याची माहिती पर्यवेक्षकांना अगोदरच द्यावी उदाहरणार्थ प्रवेश पत्र, ओळखपत्र, फेस मास, पाणी बॉटल, सॉनिटायझर, हॅन्ड ग्लोज इत्यादी
 • विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसा कर्माचारी वर्ग उपलब्ध असावा 
 • विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी आणि नोंदणी करतेवेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळावे 
 • पर्यवेक्षकांना कोड ऑफ कंडक्टची माहिती परीक्षेपूर्वीच द्यावी 
 • परीक्षा केंद्राच्या आत आणि बाहेर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी भिंती पत्रक, पोस्टर अशा माध्यमातून द्यावी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात एन्ट्री करताना थर्मल स्कॅनिंग केल्याशिवाय प्रवेश देऊ नये 
 • काही लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ आयोसेट करण्याची सोय परीक्षा केंद्रात करावी 
 • विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ जवळच्या कोरोना हेल्थ केअर सेंटर मध्ये भरती करावे 
 • विद्यार्थ्यांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हॅन्ड ग्लोज, ट्रिपल लेअर मास्क घालणे आवश्यक आहे 
 • वयोवृद्ध कर्मचारी गर्भवती महिला आणि एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये. त्यांची ड्युटी लावायची असेल तर इतर ठिकाणी लावावी, जेणेकरून विद्यार्थ्यांशी थेट संपर्क होणार नाही 

परीक्षा केंद्रामध्ये घ्यावयाची काळजी 

 • परीक्षा केंद्रात मोबाईल आणि पिशव्यांना बंदी आहे 
 • लिफ्टमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे आवश्यक आहे 
 • व्हिल चेअरची आवश्यकता भासल्यास ती पूर्ण सॅनिटायझर केलेली असावी 
 • दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्यानी मास घालणे आवश्यक आहे 
 • परीक्षा केंद्रात क्यूआर कोड, स्कॅनिंग, ऑनलाइन फॉर्म, डिजिटल सिग्नेचर करणे गरजेचे आहे 
 • पाण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी डिस्पोजल ग्लास ठेवावे
 •  प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपले हात सॉनिटायझर करावे 
 • विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका घेताना आणि देताना दोन्ही हात सॉनिटायझर करावे
 • विद्यार्थी स्टेशनरी एकमेकांना देऊ शकणार नाहीत 
 • ऑनलाइन परीक्षा असेल तर संपूर्ण कंप्यूटर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक 
 • परीक्षा देणारे कर्मचारी आणि विद्यार्थी यांची माहिती एकत्रित करून ठेवावी 
 • परीक्षा केंद्रांमध्ये एसी असेल तर 24 ते 33 सेल्सियसवर चालवावा 
 • परीक्षा केंद्रातील टॉयलेट, दरवाजे, डेक्स, खुर्ची  सतत सॉनिटाझिंग करावी 
 • परीक्षा काळात एखादा विद्यार्थी संक्रमित आढळला तर त्यांना तात्काळ आयसोलेट करावे आणि डॉक्टरांना याची माहिती द्यावी, ज्या ठिकाणी आयसुलेट करण्यात आले तो संपुर्ण परिसर निर्जंतुकीकरण करावा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News