त्या अधिकाऱ्याच्या मुलीला विशेष सवलत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

कॉपीमुक्तीतून काही संस्थांना वगळण्यात आल्याचे निर्देश शिक्षण विभागाने काढले की काय अशी शंका उपस्थित होत आहे. वृत्त लिहीपर्यंत विशेष कॉपीच्या सदर प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. 

देऊळगावराजा : परीक्षा केंद्रावर मुख्याध्यापक यांच्या दालनात एक विद्यार्थिनी उत्तर पत्रिका सोडवत असल्याचे चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, देऊळगाव मही येथील नामांकित विद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्रात एका राजकीय व्यक्तीच्या मुली विशेष सवलत देण्यात आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली नसून शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कॉपीमुक्ती अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे.

तालुक्यातील देऊळगाव मही येथे एका नामांकित खासगी संस्थेच्या शाळेत बारावीच्या परीक्षा केंद्रात आज केमिस्ट्रीचा पेपर होता. या केंद्रावर पेपर सोडण्याची वेळ संपून गेल्यावर एका राजकीय व्यक्तीच्या मुलीस मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये उत्तर पत्रिका सोडविण्यासाठी देण्यात आली असा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे.

या गैरप्रकाराबाबतचा व्हिडिओ सायंकाळनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. परीक्षा केंद्रावर आज घडलेल्या कॉपीच्या सदर प्रकाराबद्दल सोशल मीडियावर काही विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसून एक विद्यार्थिनी पेपर सोडवत असल्याचे व्हिडिओ दाखविले आहे. कॉपीमुक्तीतून काही संस्थांना वगळण्यात आल्याचे निर्देश शिक्षण विभागाने काढले की काय अशी शंका उपस्थित होत आहे. वृत्त लिहीपर्यंत विशेष कॉपीच्या सदर प्रकाराबद्दल पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली नव्हती. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News