राष्ट्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये शेकडो पदांसाठी जागा; मिळेल लाखांपर्यंत पगार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 July 2020

राष्ट्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये शेकडो पदांसाठी जागा निघाल्या आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार असून कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.३ ऑगस्ट २०२० ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. 

मुंबई राष्ट्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये शेकडो पदांसाठी जागा निघाल्या आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार असून कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.३ ऑगस्ट २०२० ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. 

पुढील पदांसाठी भरती 
एनसीईआरटी सहाय्यक अधिकारी -१४२ जागा 
सहाय्यक ग्रंथपाल- २ जागा 
ग्रंथपाल -१
सहाय्यक प्राध्यापक -८३ जागा 
प्राध्यापक- ३८ जागा 

पात्रता आणि वयोमर्यादा 
शैक्षणिक पात्रता            पदे 
पदव्युत्तर आणि पीचडी -सहाय्यक अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक
ग्रंथपाल - लायब्रेरी सायन्स/इन्फॉर्मेशन  सायन्स/डॉक्युमेंटेशन तसेच सायन्समध्ये पद्युत्तर शिक्षण 

उमेदवाराची निवड आणि वेतन 
भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलॉंग आणि नवी दिल्ली येथील एनसीईआरटी  कार्यालयात कार्यालयात निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाईल तसेच उमेदवारांना त्यांच्या पदानुसार महिन्याला ५०,००० ते १,५०,००० पर्यंत वेतन दिले जाईल 

अर्जाची फी 
ncert.nic.in या संकेतस्थळावर अर्जाची माहिती उपब्ध होईल सामान्य आणि ओबीसीसाठी १००० रुपये एससी/एसटी  पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News