भारतीय विमानतळावर आगमन होताच आफ्रिकन संघाने केले...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 March 2020
  • मालिकेतला पहिला सामना १२ मार्च रोजी धरमशाला येथे होणार आहे.
  • भारत दौऱ्यात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत याचे मार्गदर्शन संघासोबत असलेले आमचे वैद्यकीय पथक करणार आहे.

नवी दिल्ली : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी भारतात दाखल झालेल्या दक्षिण आफ्रिका संघाने कोरोनापासून सावधगिरी बाळगण्यासाठी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीची टीम इंडियाही या विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्व उपाययोजन करणार आहे. यझुवेंद्र चहलने मास्क लावून प्रवास करत असलेला फोटो ट्विट केला आहे.

मालिकेतला पहिला सामना १२ मार्च रोजी धरमशाला येथे होणार आहे. भारत दौऱ्यात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नयेत याचे मार्गदर्शन संघासोबत असलेले आमचे वैद्यकीय पथक करणार आहे. त्यानुसारच आम्ही कार्यवाही करणार आहोत, असे दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक आणि माजी खेळाडू मार्क बाऊचर यांनी सांगितले.

भारतीय संघाचा लेगस्पिनर यझुवेंद्र चहलने धरमशाला येथे जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर असताना मास्क लावलेले स्वतःचे छायाचित्र प्रसारमाध्यमावर पोस्ट केले आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News