'ही' दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार 'रुपेरी' पडद्यावर 

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Monday, 8 April 2019

अभिनेत्री श्वेतांबरी घुटेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नकुशी’ या मालिकेमध्ये. याव्यतिरिक्त तिने बरेच दाक्षिणात्य लघुपट केले. शिवाय अनेक जाहिरातींमध्येही ती झळकली. आता श्वेतांबरी रूपेरी पडदा गाजवण्यास सज्ज झाली आहे.

‘सावट’ या चित्रपटामधून ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर आहे. श्वेतांबरी सांगते, लघुपट, जाहिरातींमधून मी काम करायला सुरुवात केली; पण व्यावसायिक चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा होती.

या चित्रपटाच्या निमित्ताने ही इच्छा माझी पूर्ण होत आहे. माझी या चित्रपटातील भूमिकाही प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे. हितेश देशपांडे आणि शोबिता मांगलिक निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ सिन्हा यांनी केले आहे. श्वेतांबराची सस्पेन्स थ्रिलर भूमिका या चित्रपटात काय कमाल करते, हे पाहणं रंजक ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News