सौरव गांगुलीची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 July 2020
  • माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
  • कोरोनाचा त्यांना कोणताही संसर्ग झाला नसल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

कोलकता :- माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाचा त्यांना कोणताही संसर्ग झाला नसल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. सौरव यांचे मोठे बंधू स्नेहशिष हे मात्र कोरोनाबाधित असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्नेहशिष यांना कोरोना झाल्यामुळे सौरव यांच्या बेहेला निवासस्थानात राहत असलेले कुटुंब आणि कर्मचारी होम क्वारंटाईन आहेत. या दरम्यान गांगुली यांनी आयसीसी आणि बीसीसीआयच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता; मात्र त्याचा दादागिरी हा टीव्ही-कार्यक्रम पुढे ढकललेला आहे.

सौरवला कोरोनाची कोणताही लक्षणे नव्हती, तरीही त्याने सावधगिरी म्हणून चाचणी करून घेतली आणि काल रात्री या चाचणीचा अहवाल आला. सौरवला कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळ आणि त्या
 
आयपीएलचा ‘पंच’

आयपीएल सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान होणार असल्यामुळे त्याचा थेट फटका पाच आंतरराष्ट्रीय मालिकांना बसणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भारताने त्यासाठी आपल्या दोन मालिका रद्द केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांची किमान एक मालिका रद्द होत आहे.
 

  • भारत वि. इंग्लंड (ट्‌वेंटी 20 तसेच एकदिवसीय मालिका, सप्टेंबर - प्रत्येकी 3 लढती)
  • ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज (ऑक्‍टोबर, ट्‌वेंटी 20 मालिका - 3 लढती)
  • भारत वि. ऑस्ट्रेलिया ( ट्‌वेंटी 20 मालिका, ऑक्‍टोबर - 3 लढती)
  • पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका (ट्‌वेंटी तसेच एकदिवसीय मालिका, सप्टेंबर - प्रत्येकी 3 लढती
  • बांगलादेश वि. न्यूझीलंड (ट्‌वेंटी 20 मालिका, ऑक्‍टोबर - 3 लढती)
  • (वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका (दोन कसोटी आणि 5 ट्‌वेंटी 20, सप्टेंबरअखेरपासून, दोन देशांच्या मंडळात चर्चा सुरू)
  • श्रीलंका बांगलादेश मालिका : लंकेचे दोन खेळाडूच आयपीएलमध्ये असल्याने मालिका अपेक्षित) च्या पाठीराख्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News