आता लवकरच ते ‘कामयाब’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

अभिनेता संजय मिश्रा यांचे ‘ऑल द बेस्ट’, ‘गोलमाल’, ‘किक’, ‘दिलवाले’सारखे अनेक चित्रपट गाजले. ते एक विनोदी अभिनेता म्हणूनही ओळखले जातात.

अभिनेता संजय मिश्रा यांचे ‘ऑल द बेस्ट’, ‘गोलमाल’, ‘किक’, ‘दिलवाले’सारखे अनेक चित्रपट गाजले. ते एक विनोदी अभिनेता म्हणूनही ओळखले जातात. आता लवकरच ते ‘कामयाब’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

नुकतेच ते दिग्दर्शक हार्दिक मेहता यांच्यासोबत वर्सोवा येथील ‘मक्का ऑफ स्ट्रगलिंग ॲक्‍टर’ या ठिकाणी पाहायला मिळाले होते. त्यावेळी ते एका बुर्जीपावच्या गाडीवर स्वतः बुर्जी बनवताना दिसून आले.

यावेळी त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील स्ट्रगलिंगच्या आठवणींना उजाळा दिला. एकेकाळी ते याच ठिकाणी येऊन बुर्जीपाव खात असत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News