लवकरच आयुष शर्माचा ‘मुळशी पॅर्टन’ प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

आयुष मराठीत गाजलेला चित्रपट ‘मुळशी पॅर्टन’च्या हिंदी रिमेकमध्ये एका गॅंगस्टरची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या नावाबद्दल आणि आयुषसोबत कोणते कलाकार झळकणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अभिनेता आयुष शर्माने ‘लव्हयात्री’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सध्या तो ‘क्‍वाथा’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

या चित्रपटानंतर आयुष मराठीत गाजलेला चित्रपट ‘मुळशी पॅर्टन’च्या हिंदी रिमेकमध्ये एका गॅंगस्टरची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या नावाबद्दल आणि आयुषसोबत कोणते कलाकार झळकणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीत हा चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लिहून आणि दिग्दर्शित केला होता. हिंदी रिमेकचे दिग्दर्शन कोण करणार, हे गुलदस्त्यातच आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News