लवकरच ८ हजार पोलिसांची भरती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

सध्या गृहमंत्री अनिल देशमुख सातारा दौ-यावर आहेत, त्यांनी पत्रकार परिषदेत ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. भरतीचे नियोजन सुरू असून कोरोनाची परिस्थिती पाहून भरती प्रक्रिया होईल. 

सातारा - कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झाल्यानंतर आपले कर्तव्य बजावत असणा-या हजारो पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर पोलिस दलातही खळबळ माजली होती. काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर काही पोलिस कोरोनाच्या संकटातून बाहेर पडले. 

सध्या गृहमंत्री अनिल देशमुख सातारा दौ-यावर आहेत, त्यांनी पत्रकार परिषदेत ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. भरतीचे नियोजन सुरू असून कोरोनाची परिस्थिती पाहून भरती प्रक्रिया होईल. 

तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून नागरिकांनी काळजी घ्यायला हवी असंही त्यांनी साता-यातील नागरिकांना सांगितलं. कोरोनाची परिस्थिती पाहून पोलिस भरतीचं आयोजन करण्यात येईल असंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. 

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नियमावली शिथील केली जात असली, तरी इतर जिल्ह्यांत नागरिकांना प्रवेश करायचा असेल. तर पास काढणे आवश्यक आहे. याबाबत कडक नियमावली करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

विशेष म्हणजे आत्तापर्यंत संस्थात्मक विलगीकरण करत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भात रोकण्यात राज्य सरकारला यश आले आहे. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणावर अधिक भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News