जेईई- नीट परीक्षेसंदर्भात सोनू सूदने केले ट्विट; मोदी सरकारकडे केली 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

सोनु विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. लॉकडाऊन काळात विदेशात आडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सुदने मोलाचे सहकार्य केले होते. त्यामुळे विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले. 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई- नीट परीक्षा स्थगित करण्यासाठी पालक- विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली. या मागणीला प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने पाठींबा दिला. प्रधानमंत्री कार्यालय, मानव संसाधन विकास मंत्रालय यांना टॅग करुन जेईई-नीट परीक्षा स्थगित करण्यासाठी विनंती ट्विटरद्वारे केली. सोनु विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. लॉकडाऊन काळात विदेशात आडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सुदने मोलाचे सहकार्य केले होते. त्यामुळे विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले. 

काय लिहलय ट्विटमध्ये

 

मंगळवारी (ता. 25) सोनुने ट्विट केले त्यात म्हटलं आहे की, 'देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून  सरकारने नीट-जेईई परीक्षा स्थगीत करावी' अशी विनंती सोनू सूद ट्विटरद्वारे केली आहे. अनेक दिवसापासून जेईई- नीट या दोन्ही परीक्षा स्थगीक करण्याची मागणी होत होती. परीक्षा घेण्यासाठी सरकारने हालचाल सुरु केली त्यामुळे परीक्षा स्थगित करण्यासाठी पालकांनी कोर्टामध्ये घाव घेतली मात्र, कोर्टाने परीक्षा घेण्याचे आदेश सरकारला दिले, आता काही दिवसांवर परीक्षा येऊन ठेपली आहे. त्यामळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसले आहे. यामुळे सोनुने प्रधामंत्री कार्यालाय आणि शिक्षण मंत्री यांना परीक्षा स्थगीत करण्याची विनंती केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सोमवारी एक ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा झाली, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती, मी पुन्हा एकदा केंद्र सरकारला विनंती करते की, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत सरकारने विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित कराव्या' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले, मात्र केंद्र सरकारकडून यावर कोणतेही प्रतिक्रीया आली नाही. आता सरकार काय भूमिका घेणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News