अखंड एकात्मतेची गाथा..

सुदाम गणेश भोसले
Wednesday, 1 May 2019

अतिप्राणप्रिय "महाराष्ट्र" माझा,
इथे टेकतो आमुचा माथा...!!!!

महाराष्ट्र माझा...
सह्याद्रीचा आसमंत दुमदुमून,
सांगतो शौर्याच्या गाथा...
अखंड पराक्रमाच्या स्फुल्लिंगापुढे,
सदैव टेकतो आमुचा माथा...!
अतिशूरवीर अन् समाजसुधारकांच्या ,
कित्येक क्रांतिकारी कथा...
समाजसुधारणेच्या इतिहासापुढे, 
सदैव टेकतो आमुचा माथा..!!
विसरलो नाहीत "ते" तेजस्वी बलिदान,
अन् महाराष्ट्राच्या व्यथा...
त्या निःस्वार्थी बलिदानापुढे,
सदैव टेकतो आमुचा माथा...!!!
वैभवशाली परंपरा, संस्कृती अन्
अखंड एकात्मतेची गाथा..
अतिप्राणप्रिय "महाराष्ट्र" माझा,
इथे टेकतो आमुचा माथा...!!!!
   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News