दाऊदसह अनिल कपूरचा फोटो शेअर करणाऱ्याला सोनमने  दिले प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020

नुकतीच सोनमने दिल्लीतील शाहीन बाग गोळीबार केल्याच्या बातमीच्या संकेतस्थळाचा लींक शेअर केली.

सोनम कपूर ही बॉलिवूडमधील त्या सेलेब्रिटीज पैकी आहे जे बहुतेक राजकीय भूमिकेपासून दूर राहतात. पण ट्रोल्सला उत्तर देण्यापासून ती मागे हटत नाही. नुकतीच सोनमने दिल्लीतील शाहीन बाग गोळीबार केल्याच्या बातमीच्या संकेतस्थळाचा लींक शेअर केली. या घटना चुकीची आहे म्हणत,

तीनं लिहलं,

''ही अशी घटना आहे, ज्याची मला  अपेक्षा नव्हती  की हे भारतात होईल . हे विभाजनशील आणि धोकादायक राजकारण थांबवा. यामुळे द्वेष पसरतोय. आपण स्वत: ला हिंदू मानत असल्यास समजून घ्या की धर्म हेच कर्म आहे. मात्र जे घडले ते दोघांपैकी एक नाही.''

 जेव्हा अनिल कपूर बाबत विचारला गेला प्रश्न

सोनमचे हे ट्विट कित्येकांना समजले नाही आणि काहींनी तिच्याबद्दल चांगले, वाईट बोलण्यास सुरवात केली. परंतु या सर्व कमेंटच्या दरम्यान सरकारी वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या एका पत्रकाराने सोनमचे वडील अनिल कपूर यांच्यावर प्रश्न केला. या पत्रकाराने अनिल कपूर यांचे एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ते दाऊद इब्राहिमसोबत ते दिसत आहेत. त्याने सोनमला फोटो टॅग केले आणि विचारले की, अनिल कपूर यांचे दहशतवादी दाऊदशी संबंध त्याच्या कर्माशी संबंधित होते की त्याच्या धर्माशी ?

त्यावर सोनम कपूर यांनी थेट उत्तर दिले

त्याला उत्तर म्हणून सोनमने लिहिले,
''क्रिकेट, भारतीय क्रिकेटशी संबंध आहे त्या फोटोचा. तो (अनिल कपूर) राज कपूर आणि करिश्मा कपूरसोबत क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. ते  बॉक्समध्ये सामना बघत बसले होते. मला वाटते की आपण इतरांवर बोट दाखविणे थांबवावे, कारण जेव्हा आपण असे करता तेव्हा आपल्याकडे तीन बोटे इशारा करीत असतात. मला आशा आहे की हे दुष्परिणाम आणि हिंसाचार पसरवण्यासाठी भगवान राम तुम्हाला माफ करतील.''

 

सोनम कपूर यांच्या उत्तरानंतर पत्रकाराने पुन्हा एकदा अनिल कपूर यांना टोमणे मारून प्रत्युत्तर दिले.

यानंतरही सोनमला ट्रोल केले जात आहे. लोकं सोनमच्या फोटोशूट शेअर करत अश्‍लील कमेंट करत आहेत.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News