सोनम कपूरची गरजूंना मदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 June 2020

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचा प्रत्येक गोष्टींवर परिणाम होताना दिसत आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक सामान्य आणि गरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या गरजूंना मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, कलाकार पुढाकार घेत आहेत. यामध्ये सोनम कपूर देखील मागे नाही.

मुंबई : सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचा प्रत्येक गोष्टींवर परिणाम होताना दिसत आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक सामान्य आणि गरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या गरजूंना मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, कलाकार पुढाकार घेत आहेत. यामध्ये सोनम कपूर देखील मागे नाही.

या कठीण परिस्थितीत तिने बऱ्याच लोकांना मदत केली आहे. यामध्ये काही बॉलीवूड इंडस्ट्रीतील ज्युनिअर कलाकार आणि बाहेरील काही लोकांचा समावेश आहे. सोनम नेहमी गरजूंसाठी काम करत असते, तिने अनेक स्वयंसेवी संस्थाना देखील मदत केली आहे. ती नेहमीच समाज कार्यात सक्रिय असते, मात्र याबद्दल बोलणे तिला आवडत नाही, म्हणूनच तिने कधीही याची चर्चा केली नाही किंवा कोणालाही ती करुनही दिली नाही. ती नेहमीच तिच्या प्रामाणिकपणासाठी ओळखली जाते. कोरोनामुळे हतबल झालेल्या अनेकांना तिच्या मदतीने दिलासा मिळाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News