मदतीसाठी सोनम कपूरने केली लोकांना विनंती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 June 2020

कोरोनामुळे बॉलिवुड इंडस्ट्रीमधील अनेक लहान मोठ्या कलाकारांना फटका बसला आहे. यासाठी बॉलिवुडमधील आघाडीचे कलाकार मदत करताना दिसून येत आहेत. अभिनेत्री सोनम कपूर हिने देखील या कलाकारांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई :- कोरोनामुळे बॉलिवुड इंडस्ट्रीमधील अनेक लहान मोठ्या कलाकारांना फटका बसला आहे. यासाठी बॉलिवुडमधील आघाडीचे कलाकार मदत करताना दिसून येत आहेत. अभिनेत्री सोनम कपूर हिने देखील या कलाकारांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोनम कपूर हिने स्वत: हून योगदान देताना, सर्व लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी देखील मदतीसाठी पुढाकार घ्यावा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I’m so happy that @raw_mango joins hands with celebrated kathak dancer and choreographer, @aditimangaldas and #ARTMATTERS (an initiative of @teamworkarts) to raise funds and support the artist community and their families who have been left without any source of income, and have been affected by the pandemic in India, by creating a special film series ‘Within……from within’ a beautiful, thought provoking and engaging series of six short videos are conceptualized, choreographed and directed by Aditi Mangaldas and performed by the members of the Aditi Mangaldas Dance Company. I have donated please all of you donate as well.. these artists are trying to survive and they are taking our culture and heritage forward! #linkinbio

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

 

भारतामध्ये आलेल्या या साथीच्या रोगामुळे सर्व कलाकार आणि त्यांच्या कुटुंबियांवर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. काम गेल्यामुळे त्यांना पैसे मिळणे बंद झाले आहे. या कलाकारांच्या कुटुंबीयांसाठी आपण सर्वांनी निधी गोळा करून मदत करावी, यासाठी पुढाकार घेवून देणगी देण्याचे आवाहन सोनमने केले आहे. यासाठी तिने एका खास चित्रपटाची मालिका बनविली आहे. यांची सुरूवात रॉ मैंगो कथक नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक @aditimangaldas आणि #ArtMatters (@teamworkarts) यांच्या सोबत केली आहे. 

दरम्यान, सोनम कपूर हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून कलाकार समुदायाला आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकाला दान देण्याचे आवाहन केले आहे. सोनम कपूरच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News