शस्त्रक्रिया चालू असताना तिने केलं असं काही; डॉक्टरांनीही केला सलाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020
  • बहुतेकवेळा आपण आजारी पडलो तर डॉक्टर आराम करण्याचा सल्ला देतात. साधी अंगदुखी जरी असली तरी आपण गोळी घेऊन काही वेळ आराम करतो.  आणि त्यातच एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर २-४ महिने तरी आवर्जून आराम करावा लागतो. परंतु ब्रिटनमध्ये याउलट एक वेगळाच प्रकार घडला आहे. 

बहुतेकवेळा आपण आजारी पडलो तर डॉक्टर आराम करण्याचा सल्ला देतात. साधी अंगदुखी जरी असली तरी आपण गोळी घेऊन काही वेळ आराम करतो.  आणि त्यातच एखादी शस्त्रक्रिया झाली असेल तर २-४ महिने तरी आवर्जून आराम करावा लागतो. परंतु ब्रिटनमध्ये याउलट एक वेगळाच प्रकार घडला आहे. 

ब्रिटनमधील एका तरुणीला ब्रेन ट्युमर झाल्याने तिची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान ही तरुणी चक्क व्हायोलिन वाजविण्यात मग्न असल्याने डॉक्टरही पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.  तिचा व्हायोलिन  वाजवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून कमी वेळात जास्तीत जास्त लोकांनी तो लाईक केला आहे. 

डॅगमर टर्नर असे या तरुणीचे नाव असून ती ब्रिटनमधील एका शहरात राहते. या तरुणीला काही दिवसांपूर्वीच आपल्याला ब्रेन ट्युमर असल्याचे कळल्याने ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली. या तरुणीवर शस्त्रक्रिया चालू असताना ही तरुणी मात्र अराम न करता व्हायोलिन वाजवू लागली. यावेळी ती नाईक प्रकारच्या वेगवेगळ्या धून  वाजवत होती. डॅगमर टर्नर ही एक उत्तम व्हायोलिनवादक असल्याने आपल्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्याने आपण व्हायोलिन वाजविणे विसरू नये त्यासाठी ती शास्त्रक्रियेदरम्यान व्हायोलिन वाजवत होती असं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच आपल्याला व्हायोलिन वाजविण्याची आवड असून गेल्या १० वर्षांपासून मी व्हायोलिन वाजवत असल्याचे शास्त्रक्रियेनंतर डॅगमरने सांगितले. त्याचबरोबर तिने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News