राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत कशेने शाळेची बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

माणगाव : ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन अध्यापनात अग्रेसर असलेल्या कशेणे शाळेने बहारदार नृत्य सादर करत केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. २०१९-२० या वर्षातील विघवली केंद्राच्या केंद्रस्तरावरील या स्पर्धा २४ फेब्रुवारीला विघवली विभाग हायस्कूल येथील सभागृह प्रांगणात झाल्या.

दरवर्षी जिल्हा सेस फंडअंतर्गत सांस्कृतिक व क्रीडास्पर्धा घेण्यात येतात. प्रथम केंद्रस्तरावर नंतर बीट स्तरावर व अंतिम तालुका स्तरावर असे स्वरूप असते. या स्पर्धांचे विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक नृत्य स्पर्धा व नाट्यीकरण स्पर्धा होय. यावर्षी केंद्रातील १२ शाळा यात सहभागी झाल्या होत्या. नृत्य स्पर्धेत पहिली ते आठवी या गटात गतवर्षीची परंपरा कायम राखत कशेणे शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.

विघवली शाळा द्वितीय, तर मुंढेवाडी शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. नाट्यीकरण स्पर्धेत कोशिंबळे शाळा प्रथम, कशेणे शाळा द्वितीय, तर मुंढेवाडी शाळा तृतीय क्रमांकाने सन्मानित झाल्या.

विघवलीचे केंद्रप्रमुख सुरेश म्हात्रे यांच्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले. कशेणे शाळेने मिळवलेल्या यशाचे पालक, शिक्षण व्यवस्थापन कमिटी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News