स्वयंपाक घरातील काही खास टिप्स तूमच्यासाठी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020
 • स्वयंपाक घरात तूमच्यासाठी काही खास टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. 
 1. चिवडा कमी तेलकट करण्यासाठी तो ऑलिव तेल मध्ये बनवावा किवा 50 डिग्रीला ओव्हन मध्ये १/२ तास ठेवावा.
 2. साबुदाण्याची खिचडी मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट झाल्यावर त्यात २ चमचे दुध घालावे.
 3. शिरा आणि लाडू करताना पाणी किंवा साखरेत थोडे तूप घालावे, त्यामुळे पदार्थ मऊ होतो.
 4. पोहे करतानाच त्यात वाटी भर चुरमुरे भिजवून घालावेत त्यामुळे पोहे मुलायम मसाल्याचा वास आणि ताजेपणा टिकून रहाण्यासाठी बरणीत / डब्यात मसाला होतात आणि थंड झाल्यावरही वातड होत नाहीत.
 5. भाजी, डाळी, कडधान्ये आणि पुलाव करताना त्यात पुदिन्याची पाने घालावी त्यामुळे त्या पदार्थाची पाचकता वाढते.
 6. भरतेवेळी मसाल्यात मधून मधून हिंगाचे खडे ठेवावेत.
 7. खमण ढोकळा कूकरमध्ये सुद्धा करता येतो. फक्त कूकरच्या झाकणाला पंचा बांधून घ्यावा आणि ते झाकण नुसतेच वर ठेवावे, कूकर बंद करू नये. किंवा कूकरच्या झाकणापेक्षा जाडसर थाळीला पंचा बांधून ती कूकरवर झाकणासारखी ठेवावी.
 8. चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मुगडाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात आणि भाजणीचा स्वादसुद्धा चांगला लागत नाही.
 9. चकली भाजणीसाठी वापरायच्या सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. यामुळे डाळी वाळवण्याचा वेळ वाचतो. तसेच डाळी भाजताना वेळ कमी लागतो.
 10. आपल्याला आवडत असल्यास आपण उकडीच्या मोदकांच्या सारणांत काजू-बदामांचे पातळ काप घालू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News