नववर्षाच्या सुरूवातीला फिरायला जायचं नियोजन करताय, तर 'ही' आहेत ठिकाणे

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 January 2020

जानेवारी महिन्यातील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी सहलीचा बेत करताय ना! त्यासाठी काही पाच ठिकाणाची यादी तुमच्यासाठी आम्ही सादर करत आहोत.

नविन वर्षाच्या सुरूवातीला सर्वात पहिले आपण पाहतो की, कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या आहेत. त्यानुसार आपण आपल्या सहलीचा बेत करतो. मग ती सहल कुटुंबासह किंवा मित्र-मैत्रीण यांच्यासोबत चित्तथरारक ट्रेकिंगची असते. जानेवारी महिन्यातील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी सहलीचा बेत करताय ना! त्यासाठी काही पाच ठिकाणाची यादी तुमच्यासाठी आहे. 

1. जयपूर :- जयपूर शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. जयपूर शहराचे वैशिष्ट म्हणजे तेथील राजे महारांजाचे महाल, भव्य महालातील राजेशाही थाट, हवेल्यांमधील नृत्य हे तुम्हालासुध्दा अनुभवायचं असेल तर मग जयपुर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. गुलाबी थंडीत या गुलाबी शहरात धमाल करण्यासाठी हजारो पर्याय उपलब्ध आहेत. 'लव इज दि एअर' म्हणजे काय हे ठाऊक नसेल, तर जोडीदारासह जयपुरला जावचं लागले.' जयपूर मधील पर्यटन स्थळ अमेर फोर्ट, सिटी पॅलेस, हवा महाल इत्यादी. तुमचे सुट्टीचे दिवस संपतील पण तेथील पर्यटन स्थळांची यादी संपणार नाही. महालांची भ्रमंती केल्यानंतर राजस्थानी थाळीवर ताव मारायला विसरू नका. 

सहलीसाठी जयपूर हे ठिकाण जानेवारीत निवडण्याचे कारण म्हणजे 'द जयपुर फेस्टिव्हल!' पुस्तकांच्या गर्दीत फेरफटका मारण्यासाठी यावेळी हजारो परदेशी पाहुणेही येथे येतात. भाषा कोणतीही असली तरी, तुम्ही वाचन प्रेमी असला किंवा कविता, शायरी यांची आवड असेल, तर मग जानेवारी महिन्यातील काही दिवस जयरपुर सहलीसाठी दिलेच पाहिजेत. 

2. हंपी :- कामाच्या व्यापातून तुम्हाला जास्त दिवस सुट्टी मिळत नसेल तर मोजक्याच दिवसात पुर्ण होणाऱ्या यादीत हंपीचं नाव येते. हंपीचे वैशिष्ट्य म्हणजे जानेवारी महिन्यातील थंडीत हंपीच्या प्रत्येक देवळातील शिल्पांमध्ये सुर्याचे पहिले किरण पाहण्याचं सौंदर्य तुम्ही अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मंदिरासह वैविध्यपूर्ण लेणी, अनेक निसर्गरम्य ठिकाणे याव्यतिरिक्त खुला बाजार हा प्रकार म्हणजे महिलांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे.

खरेदीची आवड असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनाही खरेदीचा धमाल अनुभव देणारा बाजार, सवलतीच्या दरात अनेक वस्तूंचा खजिना एकाच ठिकाणी तुमच्या समोर घेऊन येत आहोत. एवढेच नाही तर कमी गर्दीचे ठिकाण तुम्हाला निवांत सहलीचा आनंद देईलच, मात्र तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शांतता तुम्हाला जाणवेल. महिलासाठी सुरक्षित जागा आहे. तेथील प्रत्येक हॅाटेल्स हे संपूर्णपणे निसर्गाच्या कुशीत बांधण्यात आल्यामुळे येथील वास्तव्याचा प्रत्येक क्षण तुम्हाला अलहादायक आणि मनसोक्त जगता येतो. 

3.मुन्नार (केरळ) :- डिसेंबर महिना संपला असला तरी थंडीची वाट पाहणाऱ्या शहरवासीयांपैकी तुम्ही एक असाल ना? मग थंडीवरील तुमच्या नाराजीचे उत्तर आहे, केरळमधील मुन्नार हे ठिकाण. कुडकुडणारी थंडी केवळ पाहण्यापेक्षा ती प्रत्यक्ष अनुभविण्यासाठी मुन्नार हे सर्वात्तम ठिकाण आहे. मुळात केरळ म्हटले की, आपल्या समोर सर्वात पहिले लक्षात येते ते म्हणजे पांढरा शुभ्र डोसा, इडली, मेंदुवडा आणि चटकदार सांबार. पारंपारिक कौलारू घरे, नारळाची झाडे असे निसर्गरम्य वातावरण केरळ मध्ये दिसून येते. 

4. चेन्नई (तमिळनाडू) :- पारंपारिक सांस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी अजून एक पर्याय म्हणजे चेन्नई, निसर्गरम्य ठिकाण तसेच महिलांसाठी खरेदी करण्यासाठी दुग्धशर्करा योग म्हणजे सिल्कच्या साडयांचे माहेरघर अशी ओळख आहे. चेन्नईच्या बाजारात फेरफटका मारल्यानंतर ही सहल खऱ्या अर्थाने पूर्ण होते. तमिळनाडूच्या चेन्नई शहरात एका 'इंटरनॅशनल बलून फेस्टिव्हलचे' आयोजन करण्यात येते. या फेस्टिव्हलमध्ये परदेशी फुगेप्रेमींचाही सहभाग असतो. यात विविध रंगाचे मोठमोठे फुगे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा आकर्षित करतात. त्यामुळे जानेवारी महिन्यात चेन्नईची सहल खास ठरते. 

5. गुजरात :- महाराष्ट्रापासून सर्वाधिक जवळ असलेल्या गुजरातची सहल स्वस्त आणि मस्त आहे. भरूच येथील हिरव्यागार वनराईत नाचणारे मोर, हे दोन्ही अनुभव एकाच सहलीत अनुभवण्यासाठी गुजरातमधील भ्रमंतीला पर्याय नाही. येथील बाजारपेठेत रंगीत घागराचोली, बांधणीच्या साड्या त्यांचे शेकडो प्रकार पाहण्यास मिळतात ऐवढेच नव्हे तर वस्तू घडवणाऱ्या कारागिरांचीही भेट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तेथे तुम्ही कमी दिवसात सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकतात. उन्हाळा सोडून इतर कोणत्याही महिन्यात येथे तुम्ही सहल करू शकतात. पण जानेवारी महिन्यात येथे अहमदाबाद येथील पंतग महोत्सव प्रसिध्द आहे. 
  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News