पी डी कारखानीस महाविद्यालयात सॉफ्ट स्किल कार्यशाळा संपन्न

तुषार शैलेश जाधव
Wednesday, 22 January 2020

पी. डी. महाविद्यालय अंबरनाथ येथील सेमिनार हॉलमध्ये सॉफ्ट स्किल कार्यशाळा घेण्यात आली.  या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक श्री .राजीव दिवाण यांनी मार्गदर्शन केले.

अंबरनाथ : पी. डी. महाविद्यालय अंबरनाथ येथील सेमिनार हॉलमध्ये सॉफ्ट स्किल कार्यशाळा घेण्यात आली.  या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक श्री .राजीव दिवाण यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या मुख्य आयोजक मा. उमेश तायडे व  अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन  चे चेअरमन यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण व नोकरी घेत असताना कोणत्या क्षमता निर्माण कराव्यात यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती.  दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर हे  उपस्थित होते.

श्री राजीव दिवान यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अत्यंत शिस्त व वेळेचा सदुपयोग केला पाहिजे असे विद्यार्थांना सांगितले . आज जगाच्या महत्वपूर्ण  म्हणजे चलन म्हणजे वेळ आहे त्यामुळे वेळ फार जपून वापरणे गरजेचे आहे ते विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी जीवनातच पालन करणे गरजेचे आहे असा संदेश त्यांनी दिला.
मुलाखतीचे तंत्र त्यांनी अत्यंत सुलभ भाषेत सांगितले. एकंदरीत व्यक्तिमत्व विकास कसा करावा हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर यांनी व्यक्तिमत्व विकास स्वतःमध्ये शिस्त आल्या शिवाय निर्माण होऊ शकत नाही असे मत मांडले.

उमेश तायडे यांनी उद्योजकता महत्वाचा गुण विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. कारण त्याचा अभाव मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात जाणवतो. यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली असे ते म्हणाले. महाविद्यालयात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय निश्चिते होते.
प्रा. आनंदाने दांडगे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची धुरा सांभाळली. व कार्यक्रमाची समाप्ती केली . 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News