रॅप सॉंगच्या माध्यमातून तरुणांनी दिला कोरोनावर सामाजिक संदेश; पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 April 2020
  • लॉकडाऊन असताना स्टुडिओमध्ये जाता येत नसल्यामुळे हे रेकॉर्डिंग त्यांनी स्वतःच्या किचनमध्येच केलं आहे.

मुंबई: सध्या कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण जगात आपलं थैमान माजवलं आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार, पोलीस निरीक्षक, वारंवार आपल्याला घरी बसून राहण्याचे आवाहन करत आहेत.  मात्र, असं असताना लोकांमध्ये  या आजाराचं गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे याच घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई मानखुर्दमध्ये राहणाऱ्या विलास छत्रे आणि त्याच्या मित्रांनी एका रॅप सॉंगच्या माध्यमातून देशातील जनतेला घरीच बसण्याचा एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यासाठी संगीत रंजन झा याने दिले आहे तर या गाण्याचे बोल विलासने स्वतः लिहिले आहेत.

लॉकडाऊन असताना स्टुडिओमध्ये जाता येत नसल्यामुळे हे रेकॉर्डिंग त्यांनी स्वतःच्या किचनमध्येच केलं आहे. या गाण्याची शूटिंगसुद्धा त्यांनी बाहेर कुठेही न जाता बिल्डिंगच्या  गच्चीवरच केली आहे त्यातही शक्य तितकं सोशल डीस्टनसिंग ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तर काही शॉट्स त्यांनी मित्रांच्या मोबाईल मध्ये त्यांच्याच घरून शूट करून ऑनलाईन मागवले. या गाण्यामागे एकूण १०-१२ लोकांची टीम होती आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांना १ आठवडा लागला.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News