सोशल मीडिया

ऋतुराज वीर
Friday, 18 September 2020

फ्रेंड्स, आपण जेवढी सोशल मीडिया वर प्रतिमा दाखवतो ना त्या प्रमाणेच आपल्या मनाला पण आरसा दाखवला पाहिजे. कारण आरसा कधी खोटे दाखवत नाही. कधी खोटी प्रशंसा नाही करत. आरसा कधी त्या गोष्टी पण नाही लपवत ज्यांना आपण लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आरसा तर फक्त सत्य दाखवतो

सोशल मीडिया

आजच्या या व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबूकच्या युगात आपला लूक खूप महत्वाचा होऊ लागला आहे. एक काळ होता जेव्हा आपण आपले सौंदर्य वाढविण्यासाठी फक्त मेकअपवर अवलंबून राहत होतो. पण आज आपल्या मोबाईल अॅप्समध्ये एवढे फिल्टर्स असतात की आपला चेहरा सेकंदात चंद्रासारखा चमकदार करू शकतो.

तसं सुंदर दिसण्यात किंवा सुंदर असण्यात वाईट असं काही नाही, पण हळूहळू आपलं जीवन हे दिखाऊ बनायला लागलं आहे. मग आपण  काय आहे फरक पडत नाही, आपण खूष असो किंवा नसो पण व्यक्त करायला लागतं, आपण सुंदर आहे किंवा नाही पण दाखवला लागतं, आपण स्मार्ट असो किंवा नसो पण सांगायला लागतं, आपण श्रीमंत असो किंवा गरीब हे पण दाखवायला लागतं...

ही सगळी ड्रामा, अॅक्टिंग करता करता आपण आपल्या रिअल जीवनापासून हळूहळू दूर चाललो आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण स्वतः कोण आहे हे विसरत चाललोय. कोणी तरी म्हणलं आहे ना 

जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तुरी

कितना मुश्किल है तय करना खुद से खुद कि दूरी

भितर शून्य बाहर शून्य, शून्य चारों ओर हैं,

मैं नहीं हूं मुझमें फिर भी

मैं मैं का ही शोर है

फ्रेंड्स, आपण जेवढी सोशल मीडिया वर प्रतिमा दाखवतो ना त्या प्रमाणेच आपल्या मनाला पण आरसा दाखवला पाहिजे. कारण आरसा कधी खोटे दाखवत नाही. कधी खोटी प्रशंसा नाही करत. आरसा कधी त्या गोष्टी पण नाही लपवत ज्यांना आपण लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आरसा तर फक्त सत्य दाखवतो. 

आरसा आपल्याला आपणं खरे काय आहे हे दाखवून देतो आणि आपल्यातील कमतरता दाखवून त्या सुधारण्यासाठी संधी देतो. आपल्याला आपली कमतरता बघुन नक्कीच अनकम्फर्टेबल वाटेल, पण याने नक्कीच जीवन बदलेल. आपण जगाला धोका देऊ शकतोपण स्व:ताला आणि देवाला कधीच नाही...मनातल्या त्या आरसा सोबत दोस्ती करायला शिका.

ऋतुराज वीर

एसवाय बीएससी (संगणक शास्त्र), एच व्ही देसाई महाविद्यालय, पुणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News