सोशल मीडियाच वार आलंय

श्वेता बरकडे, सातारा
Wednesday, 17 July 2019

वार आलंय वार आलंय
सोशल मीडियाच वार आलंय
नवीन जगात आता आपल्या
तरुणाईला त्याने पछाडलय...

वार आलंय वार आलंय
सोशल मीडियाच वार आलंय
नवीन जगात आता आपल्या
तरुणाईला त्याने पछाडलय...

फक्त चॅटिंग करून 
अनोळखी व्यक्तीसोबत
प्रेम होऊ लागलंय
आजच्या जगात सोशल मेडियाच वार आलंय

करिअरच प्रोफाइल बनवण्यापेक्षा
आम्ही व्यस्त झालोय आता
सोशल मीडियावरच प्रोफाइल बनवायला
त्याच्या नादात मात्र करीयर करायचंच राहून गेलंय

सकाळी उठून पहिलं गुड मॉर्निंग चे 
मेसेज टाकण्यात आम्ही व्यस्त झालोय
पण या नादात मात्र 
घरच्यांना गुड मॉर्निंग करायचं राहुन गेलय

लाईक जास्त मिळाव्यात म्हणून
आम्ही खूप कष्ट घेतोय
फोटो एडीट करून करून
जीव घाईला येतोय

एवढे सगळे करून सुद्धा
नाहीच मिळाले लाईक्स
तर मग आमचं मात्र
मन निराश होतंय

एवढ मात्र नक्की
काल्पनिक दुनियेत जगून जगून
आमचं मात्र वास्तविक दुनियेत
जगायचंय राहून गेलंय

वार आलंय वार आलंय
सोशल मीडियाच वार आलंय
नवीन जगात आता आपल्या
तरुणाईला त्याने पछाडलय...
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News