सोशल मीडिया तुम्हाला कंट्रोल करतोय; पाहा कसा? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 September 2020

अमेरिकेतील एका संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार 2010 नंतर सोशल मीडियावर 14 ते 19 वयोगटातील 62 टक्के तरुणांचे प्रमाण वाढले आहे. तर 10 ते 14 वयोगटातील मुलांचे प्रमाण 189 टक्क्यांनी वाढले. तरुणांममध्ये 70 तर मलांमध्ये 151 टक्के आत्महत्तेचे प्रमाण वाढले आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

आधुनिकीकर, जागतिकीकरणाचा परिणाम संपुर्ण देशावर झाला. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान सर्वसामन्य नागरिकांच्या हातात आले. इंटरनेटने जगात क्रांती केली. सोशल मीडीयाच्या माध्यमातून संपुर्ण जागाला एका जाळ्यात बांधले. आज घडीला लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजन सोशल मीडियाचा सर्रास वापर करताना दिसतात. तरुणाई सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते, लाईक, कमेन्ट मिळते. आणि व्हर्चुलर जगात रममान होताना दिसते. याचा फायदा देशातली बहुराष्ट्रीय कंपनीना होत आहे. 

गेल्या आठवड्यात नेटफिक्सवर 'द सोशल दिलेमा' नावाची शॉर्ट फिल्म प्रसारित झाली. जगाचे डोळे उघडणारा सोशल मीडियाचा उद्योग शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आला. गुगल, फेसबुक, ट्विटर, इन्टाग्रामन, फिल्पीकार्ड इत्यादी कंपन्या मानवी मनावर कंट्रोळ मिळवून करोडो रुपये दरवर्षी कमवात. अमेरीका, रशिया अशा विकसीत देशातील निवडणूक जिंकून देण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. राजकीय क्षेत्रातली सुप्रसिद्ध व्यक्ती आता सोशल मीडियाच्या गाळ्यात आडकत चालले आहेत त्यामुळे भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल असे भाष्य फिल्ममध्ये करण्यात आले.   
 

सोशल मीडिया तरुणाईला कसा करतोय कंट्रोल?

गुगल, फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम इत्यादी सोशल प्लॉटफार्म कंपन्या युजर्नना आवडणाऱ्या गोष्टी सतत पुरतात. त्यामुळे युजर्स तासंतास सोशल मीडियावर अक्टीव्ह राहतात. युजर्सनी दिलेल्या सर्व प्रतिक्रीया सिस्टीममध्ये रेकॉर्ड केल्या जातात. आणि युजर्सच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. युजर्सना कोणत्या गोष्टी आवडतात त्यानुसार दाखवल्या जातात. त्यामुळे दिवसेंदिवस तरुणाई सोशल मीडियाच्या विळख्यात आडकत चालली आहे. तरुणाईला सोशल मीडियाचे वेसन लागले आहे. अमेरिकेतील एका संशोधकाने दिलेल्या माहितीनुसार 2010 नंतर सोशल मीडियावर 14 ते 19 वयोगटातील 62 टक्के तरुणांचे प्रमाण वाढले आहे. तर 10 ते 14 वयोगटातील मुलांचे प्रमाण 189 टक्क्यांनी वाढले. तरुणांममध्ये 70 तर मलांमध्ये 151 टक्के आत्महत्तेचे प्रमाण वाढले आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

जाहीरातीचा खेळ कसा चालतो?

देशातली प्रमुख कंपन्या आपले उत्पादण विकण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांसोबत करार करतात. सोशल मीडिया कंपन्या युजर्सचा डाटा गोळा करतात आणि युजर्सच्या आवडीनुसार जाहीरात दाखवतात, जाहिरातीमध्ये दाखवलेल्या वस्तू युजर्स आवडीने विकत घेतात. त्यातून करोडो रुपयांचा नफा उत्पादन कंपनी आणि सोशल मीडिया कंपनीला मिळते. 2019- 20 या वर्षात सोशल मीडिया कंपनीने 773 बिलीयन डॉलरची कमाई केली. जगातील 8.6 ट्रिलीयन डॉलरचा व्यापार 10 सोशल मीडिया कंपनीकडे आहे. 420 बिलीयन डॉलरची कॉश या कंपन्यांकडे आहे.    

उपाय काय?

  • सोशल मीडिया जेव्हा युजर्सना लाईन, शेअर, कमेन्टस करायला सांगतो तेव्हा प्रतिक्रीया देऊ नका. 
  • सोशल मीडीयावर दावलेल्या जाहीराती पाहू नका.   
  • युजर्सना जेवढ महत्त्वच आहे तेवढाच सोशल मीडियाचा वापर करा.
  • फेक बातम्या, ऑफरला बळी पडू नका 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News