दोन तरुण सायकलस्वारांनी जपले सामाजिक भान; केला "हा" अनोखा उपक्रम

पूजा पवार
Tuesday, 18 August 2020
  • कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने संपूर्ण देशात मार्च अखेरीस लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली.
  • मार्च महिन्यात लावलेला लॉकडाऊन हा पुढील चार महिने तसाच सुरु राहिला.
  • सरकारने आता लॉकडाऊन उठवला असला तरी सर्व काही नियमित होण्यास अजून बराच काळ जाणार आहे.

ठाणे :- कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने संपूर्ण देशात मार्च अखेरीस लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली. मार्च महिन्यात लावलेला लॉकडाऊन हा पुढील चार महिने तसाच सुरु राहिला. सरकारने आता लॉकडाऊन उठवला असला तरी सर्व काही नियमित होण्यास अजून बराच काळ जाणार आहे. ह्या कोरोना महामारीचा फटका जेवढा माणसांना बसला तेवढाच तो रस्त्यावरील मुक्या प्राण्यांना देखील बसला आहे. लॉकडाऊन सुरु असताना प्रत्येक जण आपापल्या घरी होते. परंतु रस्त्यावर फिरणारे मुके प्राणी मात्र अन्न न मिळाल्यामुळे उपाशी राहायचे. उपासमारीमुळे याकाळात अनेक प्राण्यांचा मृत्यू देखील झाला. अश्यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथ मुक्या प्राण्यांबद्दल माणुसकी दाखवत दोन तरुण सायकलस्वारांनी एक अनोखा उपक्रम केला.

ठाणे येथे राहणाऱ्या वरूण  दिमान आणि हर्षल इंदुलकर या दोघांनी मुक्या प्राण्यांना अन्न पुरवठा करण्याकरीता देणगी गोळा करण्यासाठी सलग ४८ तास इनडोअर सायकलींग करण्याचा उपक्रम केला.  ह्या दोघांनी १४, १५ आणि १६ ऑगस्ट यादरम्यान सलग ४८ तास इनडोअर सायकलींग करून जवळजवळ ७०० किलोमीटर होईल इतके अंतर पार केले. तसेच जे लोक ह्या मुक्या प्राण्यांना मदत करण्यासाठी आर्थिक स्वरूपात देणगी देऊ इच्छितात अश्यांकरीता एक डोनेशन लिंक तयार करण्यात आली होती. वरूण आणि हर्षल या दोन्ही तरुणांचा  इनडोअर सायकलींगचा उपक्रम हा फेसबुक पेज तसेच इंस्टाग्रामवर लाईव्ह होता. त्यामुळे देश विदेशातील लोकांनी या सामाजिक उपक्रमाकरीता देणगी दिली.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Covid-19 has affected so many lives and we are getting the privilege to stay in our homes, so we came up with the thought of giving back to the society during this pandemic situation. Me and my friends organized this event where @_varun.dhiman_12 and @harshal_indulkar took the challenge of completing 48 hours of Indoor Cycling. This challenge not only helped in providing aid and support to others with the help of @hemkunt_foundation and @mypalclub as our Charity Partners, but also helped both of our participants to cross their limits and achieve something which was never done or even thought of before by them! If you like the video, please share it with others and it will help us organize such events in the future! Team Cyclics Video edit by - @norbu_tenzin10 @cyclingmonks @tez_kachua @roadraptors @indiacyclingevents @mumbaimtboffroaders @westcoastriders_mumbai @ashley_moras @cycle.and.chai @ccmag_in @madoverbiking @pedalandtringtring @pedaling_united @prathamesh_pdv @patlanchasumit @inspireindiaultraraces @townieontravel @decathlonsportsindia @anurag2501 @irregulars.ultra

A post shared by CYCLICS (@teamcyclics) on

 

वरूण  दिमान आणि हर्षल इंदुलकर हे दोघे अनेक लॉंग डिस्टंस सायकलिंग रेस मध्ये सहभागी होत असतात.  हर्षल इंदुलकर हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून तो रोटरी क्लब चा देखील सदस्य आहे तर वरूण दिमान हा हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. वरुण आणि हर्षल ह्या दोन तरुणांच्या उपक्रमाला हेमकुंत फाऊंडेशन, पेट ओनर अँड लव्हर फाऊंडेशन ह्या दोन मुक्या प्राण्यांची देखभाल करणाऱ्या सामाजिक संस्थांनी देखील या दोघांच्या उपक्रमाला  सहकार्य केले. वरूण आणि हर्षल यादोघांनी १४ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता इनडोर सायकलींगला सुरुवात केली होती. मुक्या प्राण्यांना नियमित अन्न पुरवठा करण्यासाठी तरुण सायकलस्वारांनी केलेल्या ह्या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. आपण ह्या समाजव्यवस्थेतील दुर्लक्षित घटकांना मदत करण्याकरीता काही तरी करू शकलो याचे समाधान असल्याची भावना ह्या दोन तरुणांनी व्यक्त केली आहे. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News