...म्हणून झहीर खानच्या घरच्यांनी मागितली "चक दे इंडिया"ची सीडी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 January 2020

मुंबई : झहीर खान आणि सागरिका घाटगे या दोघांच्या लग्नानंतर दोघांनीही आपापल्या करिअर मधून निवृत्ती घेतली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिचा आज वाढदिवस आहे. मात्र तिने आपल्या आणि झहीरच्या लग्नाबाबतचे अनेक किस्से मुलाखती दरम्यान सांगितले आहेत.

सागरीकाचा 'चक दे इंडिया' हा चित्रपट खूप गाजला. त्यासोबतच तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. लग्नासाठी घरच्यांना तयार करणे सोपे नव्हते, असे ती सांगते. 

झहीर याबाबत म्हणाला की, ज्यावेळी मी घरच्यांना सागरिकाबद्दल सांगितले, त्यावेळी त्यांनी सर्वात आधी 'चक दे इंडिया' चित्रपटाची सीडी मागविली. त्यांनी संपूर्ण सिनेमा पाहून नंतर लग्नासाठी होकार दिला.

सागरीकाच्या घरी देखील सारखीच परिस्थिती होती. झहीरच्या मराठी बोलण्यावर घरचे लग्नासाठी तयार झाले, असे ती सांगते. सागरिका आणि जहीरने अनेक वर्ष एकमेकांना डेट केले, त्यानंतर लग्न केलं. सध्या ते एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News