...म्हणून तरुणाई अडकली पब्जीच्या विळख्यात

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Saturday, 15 August 2020

ग्रामीण भागतील तरुणाईल लॉकडाऊनमुळे नव्या डिजिटल जगात आडकली आहे. पारंपारिक खेळ सोडून ऑनलाईन गेमच्या जगात भरकटली आहे. 

नांदेड : लॉकडाऊन काळात सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यामुळे तरुणाईकडे भरपुर वेळ शिल्लक होता. दिवसभर घरात बसून, टीव्ही पाहून तरुणाई कंटाळून गेली. त्यामुळे मनोरंजन म्हणून तरुणाईने गेम खेळण्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे ग्रामीण भागतील तरुणाई लॉकडाऊनमुळे नव्या डिजिटल जगात आडकली आहे. पारंपारिक खेळ सोडून ऑनलाईन गेमच्या जगात भरकटली आहे. १० वर्षापासून ते २५ वर्षापर्यंतची मुले सर्सार गेम खेळताना दिसतात. तहान, भुक हारवून गेम खेळण्यामध्ये ती तल्लीन झाली आहे. गेमच्या विळख्यातून बाहेर येण्याचा सध्यातरी त्यांच्यासमोर कोणताही मार्ग नसल्यामुळे मनोरंजनासाठी खेळलेला गेम आता व्यसन बनला आहे. 

आदिवासी किनवट तालुक्यातील लोणी (झेंडीगुडा) गावात पब्जी खेळण्यासाठी तरुणाईचे अड्डे झाडाखाली बसू लागले आहेत. गावात घरोघरी इंटरनेट येत नसल्यामुळे तरुणांनी गावाबाहेर जाऊन इंटरनेट येणाऱ्या जागी पब्जीचे थव्वे बसू लागले. पाऊस आणि उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी व्यवस्थीत इंटरनेट रेणाऱ्या झाडाखाली बसून पब्जी खेळण्याचा कार्यक्रम सुरु आहे. पुर्वी सावली असणाऱ्या झाडाखाली डफ खेळणारी तरुणाईल आता इंटरनेटमुळे गेम खेळण्यात गुंग झाली.

एकमेकांचे संघ बनवून सर्जिकल स्ट्रईकवर जाण्याचं काम ऑनलाईन जगात सुरु आहे. मात्र प्रत्यक्षात सामाजिक कार्यात एकत्र न येता व्हर्चुलर जगात भरकत चालली आहे. ग्रामीण भागातील तरुणाईला गेमच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे मोठा आव्हान पालकांपुढे निर्माण झाले. गेम खेळण्यांमध्ये तरुणाईचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मद्याचे व्यसन जडत त्याप्रमाणे तरुणाईला गेमच व्यसन लागलं आहे. तरुणाई गेम्सच्या विळख्यात कशी अडकत चालली आहे या विषयी तरुणाईशी चर्चा केली त्यातून काही धक्कादायाक महिती समोर आली ती पुढीलप्रमाणे 

लॉकडाऊनमध्ये आम्हाला बाहेर फिरण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे करमणुकीचं कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत आम्ही घरामध्ये बसून करणार काय असा प्रश्न निर्माण झाला. यावर ऑनलाइन गेम खेळण्याचा विचार मनात आला. पब्जी सारखा अतिशय लोकप्रिय गेमची माहिती मिळाली आणि पब्जी खेळण्यास सुरुवात केले.कालांतराने पब्जी आवड निर्माण झाली. त्यानंतर आम्ही विशिष्ट गट करून पब्जी खेळू लागलो, घरामध्ये इंटरनेट नसल्यामुळे गावाच्या बाहेर जाऊन झाडाखाली गेम खेळायला सुरुवात केली.
- राजेश जाधव, तरुण

पूर्वीसारखे पारंपारिक गेम गावात कोणी खेळत नाही, त्यामुळे आम्ही ऑनलाइन गेम खेळण्याचा मार्ग स्वीकारला. काही तरुण एकत्र येऊन एक संघ तयार केला आणि एकमेकाला मारण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकवर निघालो. त्यानंतर गेममध्ये अधिकच रस वाढत गेला आणि गेमच्या प्रेमात केव्हा पडलो हे कळाले नाही. 
- रुपेश गायकवाड, तरुण

माझा मित्र दररोज पब्जी गेम खेळायचा, मी बाजूला बसून त्याचा गेम पाहायचो, त्याच्यासारखं खेळता याव असं नेहमी वाटायचं. एका दिवशी मी गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या प्रतिस्पर्ध्याला हरवलं. तेव्हापासून आपणही इतरांना हारवू शकतो असा आत्मविश्वास मनामध्ये निर्माण झाला. आणि गेम खेळण्यास सुरुवात केली 
- सेवक दर्शनवाड, तरुण 

गावातील तरुण ऑनलाईन गेम खेळत होते, त्यांनी मला गेम खेळण्याचे विनंती केली. माझे मित्र गेम खेळण्यासाठी प्रोत्साहीत करत होते, त्यामुळे मला खुप भारी वाटलं. आणि मी गेम घेळायला सुरुवात केली. 
- दिनेश गायकवाड, तरुण

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News