...म्हणून सोनू सूदला १ महिन्याचे वेतन देणार फॉन्स; अभिनेता सोनूने दिले 'हे' उत्तर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

एका फॉन्सने सुदच्या कामावर प्रभावित होऊन एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले. अनेक वेळा कलाकार फॉन्सची मदत करतात मात्र यावेळी फॉन्सने कलाकाराला मदत करण्याचे जाहीर केले.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता सोनु सूदने लॉकडाऊन काळात लाखो मजूरांना मदत केली. त्यामुळे दिवसेंदिवस सूदकडे मदत मागण्याचा ओघ वाढत आहे. सोनूने एका गरजवंताला तात्काळ मदत केली. त्यामुळे एका फॉन्सने सुदच्या कामावर प्रभावित होऊन एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले. अनेक वेळा कलाकार फॉन्सची मदत करतात मात्र यावेळी फॉन्सने कलाकाराला मदत करण्याचे जाहीर केले, त्यामुळे सूदत्या कामाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सुद समाजाचा खरा हिरो ठरला आहे.

आई वडिलाने मुलाच्या मदतीसाठी सोनूकडे मगाणी केली, सोनुने तात्काळ मुलाचा सर्व खर्च उचलला आणि बाळाच्या आई- वडिलांना आता चिंता करुन नाका, तुमच्या मुलाची सोय झाली आहे असे सांगितले. सोनुच्या कामावर प्रभावित होऊन चाहत्याने चक्क महिन्याचं वेतन देण्याची इच्छा सोनूकडे व्यक्त केली. 

फान्स मुकेश कुमार म्हणला की, मी जास्त काही करु शकत नाही @SonuSood भाऊ, मी तुम्हाला एका महिन्याचे वेतन देवू शकतो त्यामुळे तुम्ही अधिक लोकांची मदत करु शकाल.
धन्यवाद @SonuSood सोनु सुद भाऊ
माझा नं. 9939646073

यावर सोनुने चाहत्याला धक्कादायक उत्तर दिले. सोनू म्हणाला की, 'तुमच्या एवढा या जगामध्ये श्रीमंत कोणीच नाही? घरा शेजारी असणाऱ्या कुटुंबाना तुम्ही नेहमी मदत करा, तुमचे वेतन माझ्यापर्यंत पोहोचले असे मी जाहीर करतो. असे ट्विटरद्वारे सांगितले. सामान्य व्यक्ती दिवसभर कष्ट करुन कमवतो, त्यामुळे सर्वसामान्याचे जीनव काय असते याची जाणीव सुदला आहे. त्यामुळे त्यांनी फॉन्सचे वेतन नाकारले, आणि दुसऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.  कलाकार आणि चाहत्यांचा संवाद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News