...म्हणून साजिद खानने मला कपडे काढायला सांगितले; मॉडल डिंपल पॉलने केला आरोप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 September 2020

सुप्रसिद्ध चित्रपट हाऊसफुलमध्ये भुमीका पाहिजे असेल तर माझ्यासमोर कपडे काढ असे खानने सांगितले, अश्लीन शब्द वापरले, हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा, मी १७ वर्षाची होते, खुप घाबरुन गेले. मानसिक तणावाखाली होते. आजही तो प्रसंग आठवला तर अंगावर काटा येतो असी पॉल म्हणाली.

मुंबई : सुप्रसिद्ध निर्माता साजिद खान यांच्यावर प्रसिद्ध मॉडल डिंपल पॉलने लैगींक छळाचे आरोप केले. मात्र खान यांनी पॉलच्या आरोपावर कोणतेही अधिकृत उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, अंमली पदार्थ रॉकेट, अभिनेत्री कंगणा रणावत आणि #मीटू चळवळीमुळे बॉलीवूड ढवळून निघाली होती. या पुर्वी खानवर लैगींक छळाचे तिन वेळा आरोप झाले होते. आता पॉल- खान यांच्यात नव्या वादाला सुरुवात झाली. नेमक हे प्रकरण काय आहे समजून घेऊया.

डिंपलने आपल्या इन्टाग्रामवर व्हॉलवर एक पोस्ट लिहली आहे. त्यात आपल्यावर झालेल्या अन्यायावर भाष्य केले. संपुर्ण देशात #मीटू चळवळ सुरु होती. त्यावेळी साजिद खानवर आरोप करण्यात आले, तेव्हा माझ्यावर झालेला अन्यास सांगायचा होता, मात्र चित्रपट क्षेत्रात माझ्या पाठीमागे कोणीही नव्हते. मी कुटुंबासोबत राहत होते, कुटुंबाची जबाबदारी सांभाळाची होती, त्यामुळे बोलू शकले नाही. आता स्वतंत्र राहते आणि स्वावलंबी झाली आहे. त्यामुळे माझ्यावर झालेला अन्यास सांगत आहे. सुप्रसिद्ध चित्रपट हाऊसफुलमध्ये भुमीका पाहिजे असेल तर माझ्यासमोर कपडे काढ असे खानने सांगितले, अश्लीन शब्द वापरले, हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा, मी १७ वर्षाची होते, खुप घाबरुन गेले. मानसिक तणावाखाली होते. आजही तो प्रसंग आठवला तर अंगावर काटा येतो असी पॉल म्हणाली.

माझ्या सारख्या किती तरी तरुणींना साजित खानने छळले असेल देव जाने, तरुणींचे स्वप्न भंग करणाऱ्या खनला शिक्षा व्हायला हवी अशा कठोर शब्दात असे पॉलनी आपल्या वॉलवर लिहले आहे. मात्र साजितने या आरोपाचे खंडन केले नाही. त्यामुळे आरोपात तथ्थ असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणची दुसरी बाजू खान जेव्हा सांगतील तेव्हाच कळेल नेमक काय प्रकरण आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News