...म्हणून पब्जी कोर्पोरेशन शोधतोय भारतीय गेमींग कंपनी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020

भारतीय बाजारपेठेत टिकून रहावे यासाठी पब्जी कोर्पोरेशन भारतीय कंपनीशी करार करणार आहे. भरतामध्ये पब्जी मोबाईल चावण्याचे लायसन्स मिळविलेल्या चिनी कंपनी टेंन्सेंट यांच्या सोबतचा करार पब्जी कॉर्पोरेशनने मंगळवारी रद्द केला.

मुंबई : एका आढवड्यापुर्वी पब्जी मोबाईल गेम बॅन करण्यात आला. त्यामुळे भारतातील गेम मार्केट काबीज करण्यासाठी दक्षिण कोरियाई सरसावली आहे. भारतीय बाजारपेठेत टिकून रहावे यासाठी पब्जी कोर्पोरेशन भारतीय कंपनीशी करार करणार आहे. भरतामध्ये पब्जी मोबाईल चावण्याचे लायसन्स मिळविलेल्या चिनी कंपनी टेंन्सेंट यांच्या सोबतचा करार पब्जी कॉर्पोरेशनने मंगळवारी रद्द केला. नवीन करार करण्यासाठी पब्जी कॉर्पोरेशन भारतीय मल्टिनॅशनल गेमींग कंपनी सोबत चर्चा करत आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

या करारामध्ये गेमच्या वितरण करण्याचे अधिकार भारतीय गेमींग कंपनीला असतील तर, तर प्रकाशनाचे अधिकार पब्जी कॉर्पेरेशनकडे राहतील. पब्जी मोबाईल गेम बॅन केल्यामुळे टेंन्सेंट कंपनी मोठे आर्थिक नुसान झाले. पब्जी गेम मधून 2019 साली 100 मिलियन डॉलर पैक्षा अधिक उत्पन्न टेंन्सेंट कंपनीने भारतातून कमावले होते.  

भारत- चीन समावादात चायनाला शह देण्यासाठी सरकराने सर्वप्रथम 46 चिनी अॅपवर बंदी घातली होती. त्यात टिकटॉक, व्हीचॅट, कॅमस्कॉनर, शीन इत्यादी लोकप्रिय अॅपचा समावेश होता. भारतीय सुरक्षेच्या कारणावरुन 118 अॅपवर केंद्र सरकारने बंदी घातली. त्यात पब्जीला समावेश आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News