... म्हणून 'तान्हाजी' चित्रपटाचे पोस्टर हटविण्यात आले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 January 2020

एकीकडे अजयच्या चित्रपटाचं कौतुक होत असताना बेळगावातील ग्लोब सिनेमागृहात या चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेकडून विरोध दर्शविण्यात आला.

नवी दिल्ली : अजय देवगणचा बहुचर्चित असणारा 'तान्हाजी- द अनसंग वाॅरीअर' आज प्रदर्शित झाला. एकीकडे अजयच्या चित्रपटाचं कौतुक होत असताना बेळगावातील ग्लोब  सिनेमागृहात या चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेकडून विरोध दर्शविण्यात आला. सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळामुळे सिनेमागृहात लागलेले चित्रपटाचे पोस्टर हटविण्यात आले.

अलीकडेच काही दिवसांपूर्वी कनसेच्या प्रमुखांनी समितीच्या नेत्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद कोल्हापूरासह महाराष्ट्रातील इतर भागात उमटले होते. त्याचा परिणाम म्ह्णून कोल्हापुरातील शिवसैनिकांनी कोल्हापूरमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट बंद पाडला होता त्याच पार्श्ववभूमीवर  
कनसेच्या कार्यकर्त्यांनी ग्लोब सिनेमागृहात गाेंधळ घालून प्रदर्शित झालेला  'तान्हाजी- द अनसंग वाॅरीअर' हा चित्रपट बंद पाडून गोंधळ आणि दबाव निर्माण करत त्यांनी तान्हाजीचे पोस्टर उतरवायला लावले.घडलेला प्रकार पाेलीसांना कळताच त्यांनी घटनेची दाखल घेतली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News