पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्रे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्रे

पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्रे

पुणे - कोरोनाच्या काळात सगळं कसं आपल्याला ऑनलाईन पध्दतीने होताना दिसतंय, त्यामुळे एका नव्या युगात असल्यासारखं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविकचं आहे. पण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ ऑनलाईन होणार आहे. विद्यापीठाकडून समारंभाचे आयोजन गुरूवारी ४.३० वा ऑनलाईन केले असून राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी, फोर्ब्स मार्शल प्रा. लि. चे सहअध्यक्ष डॉ. नौशाद डी. फोर्ब्स हे प्रमुख पाहूणे म्हणून ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर स्नातकांना उद्देशून ऑनलाइन दीक्षांत भाषण सुध्दा करतील. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र - कुलगुरू डॉ. एन. एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभ ऑनलाईन समारंभात २०१८-१९ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध शाखांमधील ७ हजार ३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये १०४ पीएच. डी झालेल्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी ७ विद्यार्थ्यांना समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या काळात भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित नाही होऊ शकत, त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन पदवीप्रदान समारंभाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थींनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचं प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे.

पदवी प्रदान समारंभ तुम्हाला पुढच्या लिंकवर पाहता येणार आहे. http://webcast.unipune.ac.in/convocationSep2020/

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News