राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे इतक्या पोलिसांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

आता कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिसांची एकूण संख्या १ हजार १५ च्या वरती पोहोचली असून आत्तापर्यंत ६० पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र - राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये, यासाठी पोलिसांनी सुरूवातीच्या काळात अहोरात्र मेहनत घेतली. त्याचबरोबर पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यात राज्य सरकारला यश आले होते. पण आता पोलिसांचे रिपोर्ट सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

सामान्य नागरिकांबरोबरचं अधिक पोलिसांना कोरोनाचे निदान झाले आहे. मागच्या २४ तासांत ७७ पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू सुध्दा झाला आहे. 

आता कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पोलिसांची एकूण संख्या १ हजार १५ च्या वरती पोहोचली असून आत्तापर्यंत ६० पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणुचा लढा कसा द्यायचा याबाबत पोलिस नागरिकांना मार्गदर्शन करत होते. मात्र सध्या पोलिस दलाला मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रादुर्भावाने ग्रासले आहे. 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील २४ तासात तब्बल १८ हजार ६५३ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले असून ५०७ जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News