एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळतात

 शिल्पा नरवडे
Monday, 3 August 2020

रक्षणाचे वचन,

प्रेमाचे बंधन,

घेऊन आला श्रावण,

बहीण भावाचा प्रेमळ  सण....!!!

रक्षाबंधन सणाच्या सर्व नागरीकांना हार्दिक शुभेच्छा...

भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. भारतीय सणांमध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह आणि उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.

महाभारतात कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता. कृष्णाने दौपदीचे रक्षण आजन्म केले.

हिंदू संस्कृतीनुसार उत्तर भारतामध्ये हा सण राखीपौर्णिमा म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पूर्वीच्या काळामध्ये, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते,  तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. साळीचे तांदूळ, सोन्याची रिंग, गोडाचा पदार्थ खाऊ घालून,  मनगटावर राखीचा धागा बांधून प्रेमाने ओवाळणी केली जाते.

राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील,  स्नेह,  पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मन प्रफुल्लीत होते.

एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता,  ऐक्य असते. असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News