...म्हणून परीक्षा देणे आवश्यक : मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

'चीनने नॅशनल कॉलेज एक्झाम gaokao आणि जर्मनीने उच्चशिक्षणासाठी abitur या दोन प्रवेश पुर्व परीक्षा घेतल्या. या विकसीत देशामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली, असा परिस्थितीमध्ये या देशांनी यशस्वीरीत्या परीक्षा आयोजित केल्या.

नवी दिल्ली : देशात कोरोणा विषाणूचा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्र सरकारने नीट आणि जेईई परीक्षा स्थगित करावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे, या मागणीला अनेक प्रादेशिक पक्षांनी समर्थन दिले. त्यामुळे भाजपवर सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून टीका केली आहे. टीकेला मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी प्रत्युत्तर दिले. 

'चीनने नॅशनल कॉलेज एक्झाम gaokao आणि जर्मनीने उच्चशिक्षणासाठी abitur या दोन प्रवेश पुर्व परीक्षा घेतल्या. या विकसीत देशामध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली, असा परिस्थितीमध्ये या देशांनी यशस्वीरीत्या परीक्षा आयोजित केल्या, त्यामुळे भारतातही विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून परीक्षा घेणे आवश्यक आहे. परीक्षा रद्द केल्या तर यंदाचे शैक्षणिक वर्ष कोलमंडून जाईल आणि  विद्यार्थ्यांच्या भिवष्याचे अतोनाथ नकसान होईल त्यामुळे परीक्षा घेणे महत्त्वाचे आहे' असे निशंक यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले 

भारतामध्ये काही विरोधी पक्ष विनाकारण शिक्षणामध्ये राजकारण करत आहेत, परीक्षा न घेण्याचा आग्रह धरत आहेत, त्यांनी परीक्षेला विरोध करू नये, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा, नाव न घेता निशांक यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन नॅशनल टेस्टींग एजन्सी परीक्षा आयोजिक करणार आहेत त्यामुळे विरोधी पक्षांनी चिंता करण्याची गरज नाही असे चोख प्रतिउत्तर कॉग्रेसला दिले. 

भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती पाहता नीट आणि जेईई परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. जेईई मेन परीक्षा इयत्ता पुवी आठ सत्रात घेण्यात येणार होती आता ती बारा सत्रात घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली, प्रत्येक वर्गात शारीरिक अंतर ठेवून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे असे निशांक यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News