...म्हणून उद्योगपती आनंद महिंद्रा उचलणार 'त्या' विद्यार्थ्याचा शैक्षणिक खर्च

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 August 2020

उद्योगपती आनंद महिंद्रा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी धावून जातात, प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनेकांना मदत करतात, महिंद्राने आपल्या ट्विटरवर सायकलवर बसून प्रवास करणाऱ्या पिता- पुत्राचा एक फोटो शेअर केला आहे.

 मनात जिद्द आणि शिकण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नाही मात्र, अशा परिस्थितीत कुटुंबाची साथ असावी लागते. मुलाला दहावीच्या परीक्षा केंद्रावर पोहचवण्यासाठी पालकाने तब्बल एकशे पाच किलोमीटर सायकलवरून प्रवास केला आणि परीक्षा केंद्रावर सुखरुप सोडले, ही बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसली. वडील आणि मुलांची जिद्द पाहून उद्योजक आनंद महिंद्रा यांनी खास गिफ्ट देण्याच जाहीर केले. त्यामुळे सोशल मीडियातून महिंद्रा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी धावून जातात, प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनेकांना मदत करतात, महिंद्राने आपल्या ट्विटरवर सायकलवर बसून प्रवास करणाऱ्या पिता- पुत्राचा एक फोटो शेअर केला आहे. त्याखाली लिहिला आहे 'वडिलांच्या  जिद्दीला सलाम. आपल्या मुलांसाठी जे वडील असे प्रयत्न करतात त्या देशाच भविष्य नक्की उज्ज्वल होणार आहे. विद्यार्थ्याला शिक्षणासाठी भविष्यात लागणारा खर्च उचलत आहोत' असं त्यांनी ट्विटमध्ये महिद्रा यांनी सांगिकले. एका पत्रकाराने विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची संपर्क करण्याचे विनंती केली आहे. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला हजारो युजर्सनी लाईक केले तर सहा  हजारांपेक्षा अधिक युजर्सने ट्विट मिळाले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News