...म्हणून मी ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतून माघार घेतोय; निक किर्गिओस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • वाढत्या कोरोना विषाणूमुळे टेनिसपटू निक किर्गिओस यूएस ओपनमधून टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.

न्यूयॉर्क : वाढत्या कोरोना विषाणूमुळे टेनिसपटू निक किर्गिओस यूएस ओपनमधून टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. दरम्यान कोविड या साथीच्या रोगामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांना श्रद्धांजली म्हणून मी ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतून माघार घेतोय; शिवाय मला सद्यपरिस्थितीत कोणताही धोका पत्करायचा नाही, सुरक्षा आणि आरोग्य महत्त्वाचे आहे, असे निक किर्गिओसने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले.

दरम्यान अमेरिकन टेनिस असोसिएशनची (यूएसटीए) न्यूयॉर्कमध्ये 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची एश बार्टीही फ्लशिंग मिड्‌स येथे झालेल्या स्पर्धेतून माघार घेतली होती. याआधी चीनच्या अव्वल महिला खेळाडू वांग कियांगनेही या स्पर्धा व अमेरिकेतील अन्य स्पर्धेतून माघार घेतली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News