...म्हणून सरकारने ब्राह्मणांकडे असलेल्या बंदुकीची माहिती मागवली अन्

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

18 ऑगस्ट 2020 रोजी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रकाश अग्रवाल यांच्या सहीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले. ब्राह्मणांकडे असलेल्या बंदुकीची माहिती 21 ऑगस्टपर्यंत सरकारकडे सादर करावी असे आदेशात म्हटले.

लखनौ: ब्राह्मणांवर होणाऱ्या अत्याचारावर योगी सरकारने एक महत्त्व निर्णय घेतला. राज्यात किती ब्राह्मणांकडे बंदुकीचे परवाने आहेत? त्यांचे माहिती सरकारकडे सादर करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एका आमदाराने ब्राह्मणांच्या सुरक्षिततेविषयी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

18 ऑगस्ट 2020 रोजी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रकाश अग्रवाल यांच्या सहीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले. ब्राह्मणांकडे असलेल्या बंदुकीची माहिती 21 ऑगस्टपर्यंत सरकारकडे सादर करावी असे आदेशात म्हटले. याविषयी एका वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला असता अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे टाळले. 'सरकारने पाठवलेल्या पत्रानुसार एका जिल्हाधिकाऱ्याने ब्राह्मणांकडे असलेल्या परवान्याची माहिती सरकारकडे सादर केली आहे, मात्र सरकारने हा आदेश काही कारणामुळे रद्द केला' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार देवमनी द्विवेदी यांनी 16 ऑगस्ट 2020 रोजी उत्तर प्रदेश विधानसभेचे प्रधान सचिव प्रदीप दुबे यांना एक पत्र पाठवून माहिती विचारली. राज्यात किती ब्राह्मणांना अत्याचार झाले? किती आरोपींवर गुन्हे सिद्ध झाले? किती ब्राह्मणांना सुरक्षा पोहचवण्यात आली? किती ब्राह्मणांनी बंदुकीचे परवाने मागितले? त्यापैकी किती जणांना परवाने देण्यात आले? अशी माहिती पत्रात विचारण्यात आली होती. यावर सरकारने अद्यापही स्पष्टीकरण दिलेले नाही. 

सरकारने यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आणि किती ब्राह्मणांनी परवान्यासाठी अर्ज केला होता? त्यापैकी किती जणांना नवीन परवाने देण्यात आले?  याची सविस्तर माहिती 21 ऑगस्ट 2020 पर्यंत ई-मेलद्वारे पाठवावे असं सांगण्यात आले. मात्र याविषयी मुख्य सचिव दुबे यांना विचारले असता 'आमच्याकडून कुठलीही माहिती मागवली नाही आणि आम्हाला कोणीही प्रश्न विचारले नाहीत' असे सांगण्यात आले. आमदार दुबे यांनीही या प्रश्नावर उत्तर द्यायचे टाळले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News