...म्हणून पहिली पत्नी असतांनाही तरुणाने केला मेहुणीशी विवाह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020
  • सामुहिक विवाह सोहळ्याचे आनुदान लाटण्यासाठी विवाहित तरुणाने पुन्हा आपल्या मेहुणीशी विवाह केला.

धुम धडाक्यात लग्न करणे हे प्रतिष्ठेच लक्षण मानल जाते. त्यासाठी कर्ज काढून लग्नात आवाढव्य खर्च केला जातो. त्यामुळे लग्नाचा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणासे झाले. सामूहिक विवाह सोहळ्यात मोफक लग्न लावण्याची योजना सरकारने सुरु केला. त्यासोबत नवविवाहित जोडप्यांना कुटुबांसाठी लागणारे सामान, कपडे, मंगळसुत्र आणि काही रक्कम अनुदान स्वरुपात दिली जाते.       

उत्तर प्रदेशच्या गढमुक्तेश्वर गावात राहणाऱ्या तरुणाने 10 वर्षापुर्वी कोतवाली गावातील तरुणीशी विवाह केला होता. तो तरुण एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांला 3 मुले झाली. 14 डिसेंबरला मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या युवकाने आपल्या मेहुणीशी लग्न केला.

सामुहिक विवाह सोहळ्याचे आनुदान लाटण्यासाठी विवाहित तरुणाने पुन्हा आपल्या मेहुणीशी विवाह केला. विवाहनंतर मेहुणीला थेट घरी घेवुन गेला. तिच्या सोबत संसार थाटण्याचा संकल्प केला. त्यामुळे कुटुंबासमोर पोच निर्माण झाला. पहिल्या पत्नीने नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, तो काहीही ऐकण्यास तयार नव्हता. तरुण आपल्या मेहुणीला बायको सारख वागवु लागला. त्यामुळे पत्नीने आपल्या नवऱ्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिस या घटनेचा अधित तपास करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News