...म्हणून कॉलेज सुरू होण्याबाबत शिक्षकही संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या अंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये बंद करण्यासंबंधित परिपत्रक ३० जून रोजी काढण्यात आले आहे. या परिपत्रकाच्या निर्णयानुसार महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याबाबीत निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणू कोविड-१९ चा वाढता प्रार्दुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची की, बंद ठेवायची या संभ्रमात सर्वच आहेत. त्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या अंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये बंद करण्यासंबंधित परिपत्रक ३० जून रोजी काढण्यात आले आहे. या परिपत्रकाच्या निर्णयानुसार महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याबाबीत निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या परिपत्रकात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थिसंबंधित सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षक आणि शिक्षेकतर कर्मचाऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. या संभ्रम निर्माण करणाऱ्या निर्णयामुळे आणि परिपत्रकांमुळे वेतन आणि सेवेसंदर्भात भविष्यात कायदेशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत. 

कोरोना विषाणूमुळे मार्चपासून शाळा-महाविद्यालयातील शैक्षणिक कामे बंद करण्यात आली आहेत. कारोना विषाणुचा वाढता प्रार्दुर्भाव पाहता लॉकडाऊन देखील वाढत गेले आहे. विद्यापीठांमार्फतही महाविद्यालये सुरू ठेवण्यासंदर्भात महाविद्यालयांसाठी आदेश काढण्यात आले. शासनाच्या निर्णामुळे ३० जून रोजी संपणारा लॉकडाउन आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. 

यामुळेच विद्यापीठाने ही ३० जून रोजी परिपत्रका काढून महाविद्यालयांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्या परिपत्रकात महाविद्यालये बंद ठेण्याचे सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर, या परिपत्रकात परीक्षा आणि महाविद्यालयाच्या कामकाजासंबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती संबंधित देखील आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पण संभ्रमात आहेत. वेतन देताना कोरोना काळातील वेतन आणि सेवांबाबत कायदेशीर अडचण निर्माण केल्या गेल्यास त्याचा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

आदेश स्पष्टता असावी

विद्यापीठ किंवा शासनाकडून महाविद्यालयांसंबंधित आदेश किंवा परिपत्रक काढताना त्यात कोणाताही संभ्रम असू नये. त्यात स्पष्टता असायला असावी. कारण महाविद्यालयांमधील प्रशासकीय आणि शैक्षणिक, परीक्षा संदर्भातील कामाची विभागणी करून त्यानुसार काम करणे सोपे होईल. परंतु एकाच परिपत्रकात दोन वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेवून त्यात सुधारणा करण्यासंर्भात शासन आणि विद्यापीठ प्रशासनाकडून पावले उचलणे आवश्यक आहे. 

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संवेदनशिल प्रकरणांमध्ये विद्यापीठाद्वारे परिपत्रक किंवा आदेश काढताना कोणत्याही प्रकारच अडथळा येऊ नये. परिपत्रक अगदी सुटसुटीत असावे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News