...तर कोरोना लसीचा उपयोग होणार नाही; वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले मत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

एप्रिल महिन्यात एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह निघाला होता, ओषधोपचाराने ते बरा झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा पॉझिटीव्ह आढळला अशी माहिती एका संशोधकांनी दिली.

मुंबई : कोरोना विषाणूवर दररोज वेगवेगळे संशोधन केले जात आहे, त्यातून अनेक निष्कर्ष पुढे आले आहेत. एकदा कोरोनामधून बरा झालेला रुग्ण दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह होत नाही असा निष्कर्ष काही तज्ज्ञांनी व्यक्त केला. मात्र कोरोनातून बऱ्या झालेल्या दोन रुग्णांना पुन्हा कोविड-१९ विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती तेलंगनाचे आरोग्य मंत्री राजेंदर यांनी दिली. अशीच एक घटना हॉंगकॉंग शहरामध्येही घडली. एप्रिल महिन्यात एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह निघाला होता, ओषधोपचाराने ते बरा झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात पुन्हा पॉझिटीव्ह आढळला अशी माहिती एका संशोधकांनी दिली. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोरोनाची लस शरीरामध्ये अँटिबायोटिक तयार करण्याचे काम करते, मात्र ती लस रुग्णांना देऊनही शरीरामध्ये अँटिबायोटिक तयार झाले नाही तर लसीचा काही उपयोग होणार नाही, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

तेलंगाना राज्यामध्ये 1 लाखापैक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यामध्ये दोन रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह निघाले अशी माहिती तेलंगाना राज्याचे आरोग्यमंत्री इतेला राजेंदर यांनी प्रसार माध्यमांना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. शरीरामध्ये अँटिबायोटिक मोठ्या प्रमाणात तयार झाल्या तर कोरोनावर मात करु शकतो. जर शरीरामध्ये अँटिबायोटिक तयार झाल्या नाही तर पुन्हा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता अधिक असते असे राजेंदर यांनी सांगितले.

पावसाळ्यात कोरोचा संसर्ग अधिक वाढणार 

कोरोना हा दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे, त्यामुळे पावसाळ्यापेक्षा तो हिवाळ्यामध्ये अधिक सक्रिय होणार असल्याचा अंदाज आरोग्य तज्ञांनी व्यक्त केला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबत काम केलेल इंफेक्शियस डिसीज एक्सपर्ट क्लाऊड स्टॉउज स्टोहर यांचा एक लेख नुसकाच प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरसचे एपिडेमायोलॉजिकल बिहेवियर कोणत्याही अन्य रेस्पिरेटरी डिसीजपासून वेगळे नसते असे लिहले आहे. पावसाळ्यात शांत झालेला कोरोना हिवाळ्यामध्ये थंडीमुळे पुन्हा सक्रिय होऊ शकतो, त्यामुळे जगाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहावे, ही लाट केव्हाही येऊ शकते आणि पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असू शकते असे स्टोहर लिहतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News