मित्र असावा तर असा...

ज्ञानु शिंदे
Monday, 9 September 2019

प्रत्येकाला गरज असते
अशा मनकवड्या मित्राची
आणि माझं ही हेच ध्येय आहे
असाचं एक मनकवडा बनण्याची...

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकतरी
जवळचा असा मित्र हवा असतो
जो व्यर्थ सल्ले देण्यापेक्षा,
फक्त मनातील सर्व ऐकून घेईल...

एक असा मनकवडा हवा असतो
जो न सांगता ही सर्व समजून घेईल
कोणतीही अपेक्षा न ठेवता
दरवेळेस हाकेला धावून येईल...

प्रत्येकाला गरज असते
अशा मनकवड्या मित्राची
आणि माझं ही हेच ध्येय आहे
असाचं एक मनकवडा बनण्याची...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News