...म्हणून सामना बंद बंद बंद म्हणत मनसे आक्रमक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद हा काही नवीन नाही. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यावेळी अधिवेशन घेतलं. हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत पक्षाचा झेंडा भगवा केला. त्यानंतर शिवसेनेकडून मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून देखील मनसेवर जोरदार टीका करण्यात आली. शिवसेना टीका करताच मनसे देखील आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमय खोपकर यांनी आगळीवेगळी मोहीम सुरू करत शिवसेनेला डिवचण्यासाठी सामना बंदचा नारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमय खोपकर यांनी ही मोहीम सुरू केली आहे.

 अमोल कोतकर यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं ते ट्विटमध्ये म्हणतात की 23 जानेवारी 1989 रोजी सामना हे शिवसेनेचं मुखपत्र सुरू झालं. त्या दिवसापासून आजतागायत नियमित सामना आमच्या घरी येत होता. पत्रकारांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो, पण सध्या रडत राऊत जी आगपाखड करत आहेत, त्याचा निषेध म्हणून आज पासून सामना बंद बंद बंद...

 ज्यांनी गेल्या महिन्यात अजेंडा अन झेंडा बदलला त्यांनी आमच्या झेंड्यावर बोलू नये.   भरभरून अग्रलेख खरडले म्हणजे कुणी थोर होत नसतं, महाखिचडीची सत्ता हातून गेली ओक्साभोकशी रडू नका. आमचा महाराष्ट्र धर्म हा तितकाच कडवा आहे असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अमय खोपकर यांनी सडकून टीका केली.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News